जव्हार तालुक्यात शिवसेनेला बळ; गणेश राजपूत यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा प्रवेश
- Navnath Yewale
- Jul 30
- 1 min read

जव्हार; शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्तत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेचे उपनेते तसेच जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे,उपमुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थक जव्हार नगरपरिषदेचे माजी सभापती गणेश राजपूत, माजी नगराध्यक्षा पदमा राजपूत यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील युवक कार्यकर्त्यांसह महिलांनी शिवसेना (शिंदे) पक्षात जाहिर प्रवेश केला.
जव्हार तालुक्यात शिवसेना ( शिंदे) पक्षाला बळ मिळण्यासाठी हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे. नगरपरिषदेचे माजी सभापती गणेश राजपूत, व पदमा गणेश राजपूत हे दाम्पत्य गेल्या दोन दशकापासून शहरासह तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहे. गणेश राजपूत यांनी नगरपरिषदेच्या सभापती पदाच्या कालावधीत सामन्य नागरिकांना केंद्रस्थानी मानून अनेक महत्वाची कामे केली आहेत. त्यांची कामाची पद्धत आणि हजरजाबाबी पणामुळे राजपूत कार्य तळागळातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले. त्यांच्या पत्नी पदमा राजपूत यांनी नगराध्यक्षांच्या कार्यकाळात शहरातील विकास कामांना प्राधान्य देत सामान्यांच्या आडणची सोडवल्या.
समान्यांच्या अडचणीत सोडवण्याची कौशल्य आणि सकटात धावून येणारं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहून गरजूवंतांना मदतीचा हात देणार्या राजपूत दाम्पत्यांचे संघटन कौशल्य सर्वश्रुत आहे. संभाव्य काळात पक्षाला जव्हार तालुक्यात बळ मिळण्यासाठी राजपूत दाम्पत्यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरातील कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला.
यावेळी तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुखांसह जिल्हा व तालुकास्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. आगामी काळात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर हा पक्षप्रवेश महत्वाचा ठरणार असल्याचा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकार्यांनी व्यक्त केला.


Comments