top of page

जितेंद्र शेळके अपघात प्रकरण: ब्रेक फेल झाले की केले? अमोल मिटकरीचा सवालहा अपघात असुच शकत नाही -अंजली दमानिया

नाशिकमधील भोंदू आणि महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांच्या कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून 10 वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे. सध्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, एकीकडे एकीकडे अशोक खरात प्रकरणावरून एसआयटीकडून सखोल तपास केला जात असून दुसरीकडे ईडीनेही खरातच्या संपत्तीवर टाच आणली आहे. त्यातच, खरातच्या शिवनिका संस्थेचे उपाध्यक्ष असलेल्या जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याने संशय निर्माण होत आहे. त्यामुळे राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्या यावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत.


जितेंद्र शेळकेंच्या भीषण अपघात प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त केला आहे. चौकशी लागलेली असतानाच दोन दिवसात शेळके यांचा अपघाती मृत्यू कसा झाला? शेळके यांचा अपघात की घातपात ? हा मोठा संशय आहे. जितेंद्र शेळके यांच्या वाहनाचे ब्रेक फेल झाले होते का केले गेले होते? याचा शोध घेतला गेला पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली. अशोक खरात प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न होत आहे का? कारण या अपघातामुळे आता खरात प्रकरण सोपं राहीलं नाही,गेल्या तीन महिन्यापासून अजित दादांच्या अपघातापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर येऊ शकले नाही, त्यामुळे जितेंद्र शेळके यांचा अपघात की घातपात? या मागील खरं सत्य महाराष्ट्र समोर येणारचं नाही, अशी खंतही आमदार मिटकरी यांनी व्यक्त केली.


जितेंद्र शेळके यांची दोन दिवसांपूर्वी चौकशी होते, आज चौकशीच्याव भोवर्‍यात असलेल्या व्यक्तीचा अशाप्रकारे अपघाती मृत्यू दाखवल्या गेलं? यांच खरं सत्य कधी समोर येणार, याबाबत आता मनात मोठी शंक असल्यांही मिटकरी म्हणाले. तर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, आमदार रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.

“ जितेंद्र शेळके हे शिवनिका संस्थानवर नंबर 2 पोजिशन वर होते. कल्पना खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यापेक्षा त्यांचे वजन जास्त होते, विशेष म्हणजे 3 दिवसापूर्वी त्यांची ईडीकडून चौकशी झाली आणि आज ते अपघातात वारले? हा अपघात असूच शकत नाही” असे ट्विट अंजली दमानिया यांनी केले आहे. त्यामुळे, आता या अपघाताची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.


रोहित पवार यांनीही व्यक्त केला संशय : आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करून शंका उपस्थित केली आहे. शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष आणि भोंदू अशोक खरातचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती झालेलं निधन अतिशय धक्कादायक आहे. अजूनही पुढं न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढं येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका येते. या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसंच भोंदू अशोक खरातच्या चौकशीचतही अनेकबाबी पुढं येणार असल्याने त्याच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी, असेही रोहित पवार म्हणाले आहेत.

Comments


bottom of page