जिल्हापरिषद निवडणुकांच्या तोंडावरच भाजपची मोठी कारवाई पक्षविरोधी कारवाईवरुन 23 जणांचे निलंबन
- Navnath Yewale
- Jan 30
- 1 min read

सिंधुदूर्ग: कोकणात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपाने पक्ष शिस्तिच्या विरोधात काम करणार्या तब्बल 23 पदाकिधार्यांच्या विरोधात कारवाई केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम केल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. 23 जणांना पक्षातून तब्बल सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. निवणुक काळात पक्षविरोधी काम केल्यास थेट कारवाई केली जाईल असाच संदेश आणि स्पष्ट इशारा या कारवाईतून भाजपने दिला आहे.
पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज कायम ठेवणे अथवा विरोधी उमेदवारांना मदत करणे, या आरोपावरून भाजपच्यवा 23 पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबीत करण्यात आले आहे. भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
या कारवाईमध्ये जिल्हा परिषेदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी सभापती वंदना किनळेकर, माजी सभापती शर्वाणी गावकर, राजन चिके यांसारच्या भाजपच्या प्रमुख पदाधिकार्यांचा समावेश असून एकून 23 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर ही कारवई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.



Comments