top of page

जिल्हापरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्यांसाठी खुषखबर




राज्य मंत्रिमंडळासाठी बैंठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या पंरतू जातवैंधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या, सदस्यत्व रद्द झालेल्या सदस्यांना प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी. अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. याचा पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे.



राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूकीत राखीव जागांवर निवडूण आलेल्या उमेदवारांना जात वैंधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैंठकीत घेण्यात आला. ग्रामविकास विभागाने हा निर्णय घेतला आहे. बैंठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. याबाबत अध्यादेश काढण्यास बैंठकीत मंजुरी देण्यात आली.

Comments


bottom of page