top of page

जीआर रद्द करायला, काय बापाची पेंड नाही- जरांगे पाटील

ree

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ओबीसी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीस उपस्थित नेत्यांनी हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर रद्द करण्याची मागणी केली. शिवाय 2014 पासून वाटप करण्यात आलेल्या जातप्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली.


ओबीसी नेत्यांच्या मागणीवरून जरांगे पाटील संतापले आहेत. दरम्यान, जीआर रद्द करण्याच्या मागणीवरून ओबीसी नेत्यांमध्ये घमासान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, जीआर रद्द झाल्याशिवाय कोणतीही चर्चा सुरू होणार नाही, कारण हा जीआर ओबीसी समाजाचा विश्वासघात आहे.


विजय वडेट्टीवार हे बैठकीला उपस्थित राहिले. बैठकीस उपस्थित नेते म्हणाले की, जर हा जीआर रद्द झाला, तर ते मुख्यमंत्र्यांचे स्वागत करतील. हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा प्रकार असून, यामुळे ओबीसींचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात ओबीसी नेते एकवटले असून जीआर रद्द करण्याचया मागणीवर ठाम असल्याने जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले. विजय वडेट्टीवार यांच्यावर जरांगे पाटील यांनी निशाना साधला. ते दिल्लीतला एक लाल्या गांधीने वडेट्टीवारला मराठ्यांच्या विरोधात बोलायला लावले आहे. काँग्रेस मराठ्यांच्या विरोधता उठली आहे. काँग्रेसबद्दल मराठ्यांमध्ये आहे ती सहानूभुती गमवणार असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले.


दिवाळीपूर्वी प्रमाणपत्र वाटप करा: हैदराबाद गॅझेटिअर नुसार मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. दिवाळीपूर्वीच प्रमाणपत्र वाटप करा, अन्यथा मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री विखे पाटील यांना सांगतो नरड्यावर येईल असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला.

Comments


bottom of page