top of page

जेव्हा भारतीय क्षेपणास्त्रांचा रावळपिंडीवर हल्ला...



भारताने पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले, तेव्हा रावळपिंडी आणि नूर, खान एअरबेस, लाहोर आणि सियालकोट सारख्या शहरांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानमध्ये भारतीय हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या भीतीची व्याप्ती थोड्या वेळाने कळली, पण तो दिवस पाकिस्तानसाठी खरोखरच अपमानजनक होता.


जेव्हा भारताने पाकिस्तानवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करून प्रत्युत्तर दिले. तेव्हा पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना इस्लामाबादजवळील नूर खान हवाई तळावरील सुरक्षित बंकरमध्ये नेण्यात आल्याची माहिती आहे. ही माहिती आता वेगवेगळ्या माध्यम संस्थांद्वारे बाहेर येत आहे. शनिवारी पहाटे जेव्हा क्षेपणास्त्रांनी लष्करी तळांवर हल्ला केला, तेव्हा घाईघाईने सुरक्षित बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला.


नूर खान हवाई तळ हा पाकिस्तानच्या राजधानीपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर असलेला एक महत्वाचा लष्करी तळ आहे. यामध्ये अनेक स्क्वॉड्रन आणि एअर रिफ्युएलिंग निट्स आहेत. तसेच पीएएफ कॉलेज चकलाला आहे, जे पाकिस्तान एअर फोर्सच्या आधिकार्‍यांना प्रशिक्षण देते. या तळावर साब एरी सर्व्हेलन्स सिस्टीम आणि सी-130 ट्रान्सपोर्टर सारखी महत्वाची हावाई दलाची विमाने आहेत.


हे एअरबस केवळ त्याच्या लष्करी मालमत्ेसाठी महत्वाचे नाही तर पाकिस्तानच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग डिपार्टमेंट मुख्यालयाजवळ असल्याने ते अधिक संवेदनशील देखील आहे. हे क्षेत्र देशाच्या अण्वस्त्र साठ्याच्या देखभाल आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. ज्यामध्ये विविध ठिकाणी पसरलेले 170 हू न अधिक अण्वस्त्रे असल्याचा अंदाज आहे.

चिनी उपग्रह कंपनी मिग- 16 व्हिजन आणि भारताच्या कावा स्पेसमधील प्रतिमा भारताच्या अचूक हल्ल्यानंतर तळाला मोठे नुकसान झाल्याचे दाखवतात. या हल्ल्यांमध्ये पायाभूत सुविधा आणि जमिनीवरील आधार वाहनांना लक्ष्य करण्यात आले होते. धावपट्टीजवळ बराचसा कचरा पसलेला होता. नष्ट झालेल्या पायाभूत सुविधांमध्ये इंधन ट्रक आणि गोदामाच्या छतांचाही समावेश होता.

Comments


bottom of page