ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत; अतुलनीय काम करणार्या 68 मान्यवरांना पद्मपुरस्कार
- Navnath Yewale
- May 28
- 2 min read

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणार्या ‘ पद्म पुरस्कारा’ ने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवन आयोजित समारंभात राष्ट्रती यांच्या हस्ते दुसर्या व अंतिम टप्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या पुरस्कार समारंभात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ (मरणोत्तर) अशोक सराफ , अच्युत पालव, अश्विनी भिडे-देशपांडे यांना कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी तसेच कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा व वैद्यकिय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कारोन राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
अशोक सराफ यांचा अभिनय जीनभर अविस्मरणीय:
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशोक सराफ यांचे ‘अशी ही बनवाबनवी’ ,‘ धुमधडाका’ , ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’ आणि ‘पंढरीची वारी’ यासारखे अनेक चित्रपट रसिकांच्या ह्रदयात कायमचे घर केले आहे. अशोक सराफ यांचा अभिनय जीवनभर अविस्मरणीय ठरला आहे. ‘ अशी हरी बनवाबनवी’ या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर अपार यश मिळवले असून, तो आजही मराठी रसिकांचा आवडता चित्रपट आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्येदेखील अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाचा ठास उमटवला आहे.
डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत:
तसेच वैद्यकिय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. होमिओपॅथीच्या माध्यमातून त्यांनी गरजूंच्या आरेाग्यसेवेत अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्या नाडी परिक्षण कौशल्यामुळे ते एक सुप्रसिद्ध होमिओपॅथीच्या चिकित्सक म्हणून ओळखले जातात. नागपूरमधील त्यांचे क्लिनिक गरजू रुग्णांसाठी आश्रयस्थान ठरले असून त्यांनी आतापर्यंत एक लाखाहून अधिक रुग्णांना उपचार दिले आहेत. 10 वर्षापूसन ते दिव्यांग- दृष्टिहीन झाले आहेत. अश्चर्य म्हणजे त्यावरही मात करून ते आपली अमूल्या सेवा रुग्णांना देत आहेत.
पहिल्या टप्यात 71 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. आज उर्वरित 68 पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये 3 पद्मविभूषण,09 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदाच्या पुरस्कार यादीत एकूण 139 मान्यवरांची निवड करण्यात आली होती. त्यात 7 पद्मविभूषण,19 पद्मभूषण, 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
Comments