ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून अंत्यदर्शन
- Navnath Yewale
- May 21
- 1 min read

जागतिक ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यदर्शन घेऊन पुष्प चक्र अर्पण केले.
अंतार विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र (आयुक्त) येथे याप्रसंगी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुणे शहर सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा आदी उपस्थित होते.
यावेळी अन्य मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी डॉक्टर नारळीकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या प्रसंगी पोलिस दलाने सलामी शोकशास्त्र तसेच बाजूशस्त्र सलामी दिली. दोन मिनिटे स्तब्ध राहून डॉ. नारळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
Comments