ज्योती मल्होत्रा प्रकरण: आयएसआय हँडलरसोबत व्हॉट्सअॅप चॅटमध्ये गुप्तहेराचा उल्लेख..
- Navnath Yewale
- May 21
- 1 min read

हरियाणाची युट्यूबर ज्याती मल्होत्राची एनआयबी, आयबी आणि पोलिस पथकाकडून कसून चौकशी सुरू आहे. तिच्या सोशल मिडिया आकाउंड्सचीही चौकशी केली जात आहे आणि तिचा फोन आणि लॅपटॉपही तपास पथकाने जप्त केला आहे. तिच्या व्हॉट्सअॅप चॅटवरुनही अनेक खुलासे झाले आहेत. माहितीनुसार, आतपार्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की, ज्योतीचा वापर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय भारतीय गुप्तहेरांना ओळखण्यासाठी करत होती. तपास यंत्रणांना आयएसआय हँडलर अली हसनसोबतचे त्याचे व्हॉट्सअॅप चॅट सापडले आहे.
महितीनुसार ज्याती मल्होत्राने आयएसआय हँडलर अली हसनसोबत अनेक व्हॉट्सअॅप चॅट्स केल्या आहेत. या गप्पांमध्ये, अली ज्योतील विचारतो की, जेव्हा ती अटारी सीमेवर होती, तेव्हा प्रोटोकॉल मिळालेले लोक कोण होते. यावर उत्तर देताना ज्योती म्हणते की, मला ते समजले नाही आणि ते लोक इतके मुर्ख नव्हते, कदाचित ज्योती भारतीय सुरक्षा दल आणि अधिकार्यांचा उल्लेख करत होती. दुसार्या एका चॅटमध्ये ‘ अंडरकव्हर’ हा शब्द वापरला गेला आहे.
या संभाषणाच्या तपशीलांवरुन, तपास यंत्रणांना असे वाटते की, ज्योतीचा वापर आयएसआय करत होता. त्याला सूचना मिळत होत्या आणि भारतीय अधिकारी, गुप्तहेर इत्यादींची ओळख पटवण्याचे काम त्याला देण्यात आले होते. सध्या, तपास संस्था हे देखील शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की, ती जाणूनबुजून आयएसआय हँडरर्सशी संबंधित होती की, ती एखाद्या मोठ्या हेरगिरी नेटवर्कची बळी ठरली आहे.
एजन्सी ज्योेती मल्होत्राच्या युट्यूब चॅनेलची माहिती देखील काढत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्यांनी या हल्ल्यासाठी भारतीय सुरक्षा दलांच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले होते. ज्योती यांनी 2023 मध्ये बैसाखी उत्सवानिमित्त पाकिस्तानला भेट दिली होती.त्या भेटीनंतर तिचे पाकिस्तानी अधिकार्यांशी संबंधी निर्माण झाले होते की. ती आधीच त्यांच्या संपर्कात होती. हे देखील तपास पथक तिच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्या संपर्कांचा वापर करून ती पाकिस्तानला गेली होती.
コメント