top of page

टकरीत दोन काळवीट विहिरीत पडले ; एकाचा मृत्यू, एक जखमी.जखमी काळवीटावर सर्पराज्ञीत उपचार सुरू; मृत काळवीटावर अंत्यसंस्कार.




पाडळी (जि.बीड)येथील शेतकरी पाखरे सखाराम यांच्या शेतामध्ये सकाळी दोन काळवटांमध्ये टक्कर चालू असताना शेतात  जमिनीलगत असलेल्या विहिरीत दोन्हीही काळवीट पाय घसरून सात परस खोल विहिरीत पडले. त्यात एका काळविटाचा जागीच मृत्यू झाला. तर एक काळविटाचा पाय मोडला. जखमी  काळविटावर  सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात उपचार सुरू असून मृत काळवीटावर झापेवाडी येथील वनपरिक्षेत्रात अंत्यविधी करण्यात आला.



 पाडळी येथील शेतकरी सखाराम पाखरे यांच्या शेतामध्ये आज दिनांक १९सोमवार रोजी सकाळी दहाच्या सुमारास दोन काळविटांमध्ये जोरदार टक्कर चालू होती. या टकरीमध्ये एकमेकांना धडका देत असताना जमिनीलगत असलेल्या सात परस खोल विहिरीत दोन्ही कावीट पाय घसरून पडले. त्यात एक काळवीट जागीच मृत्यू झाला तर एका काळवीट जखमी झाले.



विहिरीत पडलेल्या काळविटांची माहिती पाडळी येथील सरपंच गहिनीनाथ पाखरे यांनी वन विभागाला दिली. त्यानंतर या घटनेची माहिती वन विभागाने तात्काळ सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रास दिली. त्यानंतर तात्काळ सर्पराज्ञीचें संचालक सिद्धार्थ सोनवणे ,सृष्टी सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले .



 विभागीय वन अधिकारी अमोल गरकळ वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत काळे वनपाल अजय देवगडे वनरक्षक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली  सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या मदतीने श्रीराम इंगळे व अशोक इंगळे या दोन बंधूंनी सात परस खोल  विहिरीत उतरून या काळवीटास सुखरूप बाहेर काढले. यावेळी पाडळी गावचे सरपंच गहिनीनाथ पाखरे,  नवनाथ सानप आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



 त्यानंतर सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या संजीविका वन्यजीव रुग्णवाहिकेच्या मदतीने या काळविटाना शिरूर कासार येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन त्यावर उपचार केले .तर मृत काळविटाचे शवविच्छेदन पशुधन विकास अधिकारी डॉक्टर नरोटे यांनी केले. पुढील उपचारासाठी जखमी काळवीट सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात  दाखल करण्यात आले आहे.



Comments


bottom of page