टोल वसुलीला बसणार चाप, सरकारचे नविन धोरण - केंद्रीय मंत्री नितिन गडकरी
- Navnath Yewale
- Jun 18
- 1 min read

राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांच्या देयका बाबत केंद्रिय मंत्री नितिन कडकरी यांनी महत्वाची घोषणा केली आहे. देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील टोलच्या वसूलीबाबच्या तक्रारींना आता आळा बसणार आहे. मंत्री नितिन गडकरी यांनी जाहिर केलेल्या धोरणांची 15 ऑगस्ट (2025) पासून अंम्मलबजावणी करण्यात येणार आहे.
देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवरील वसुली संदर्भात तक्रारींला पूर्णविराम देण्यासाठी केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनी टोल देयका संदर्भात धोरण जाहिर केल्याची घोषणा बुधवारी (18 जून) केली. मंत्री गडकरी यांनी जाहिर केलेल्या धोरणांनुसार आता टोल नाक्याच्या देयकासाठी रोख स्वरुपात अथवा फास्ट्रॅकद्वारे देयक अदा करण्याची गरज लागणार नाही. वाहन मालक, चालकांना आता टोलचा वर्षभरासाठी पास काढता येणार आहे. तो पास वर्षभरासाठी लागू राहिल वर्षासाठी केवळ 3000 हजार रुपयांत टोल पास उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, या पासद्वारे राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवरुन 200 वेळा वाहनास ये-जा करता येणार आहे. टोल पास केवळ राष्ट्रीय महामार्गांसाठी लागू राहणार आहे. राज्यमार्गावरील टोल साठी हे पास लागू राहणार नाहीत. राष्ट्रीय महामार्गावरील टोलवर समान देयक आकारण्यात येत नाहीत, सध्या 80 रुपयांपासून विविध मुल्यांमध्ये देयके वसूल करण्यात येतात.त्यामुळे 200 फेर्यांच्या मुल्यांनुसार वर्षाला किमान 10,000 रुपयांची रक्कम टोल देयके अदा करण्यात जाते.
त्यामुळे नविन धोरणांनुसार वर्षभरात अवघ्या 3000 हजार रुपयांत टोल देयकाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शिवाय टोल नाक्यावर वाया जाणार वेळ वाचून वाहन मालक, चालकांची मोठी बचत होणार आहे. 15 ऑगस्ट पासून या नविन धोरणाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही मंत्री गडकरी म्हणाले.
Comments