ठाकरेंच्या शिवसेने नंतर आता राष्ट्रवादीलाही धक्कातंत्र; जिल्हाध्यक्षाचा थेट राजीनामा, शिंदेच्या शिवसेनेत प्रवेशाचे संकेत
- Navnath Yewale
- Jul 5
- 2 min read

परभणी : मागील महिनभरापासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहावयास मिळत आहे. शिवसेने (उबाठा) तील सहा खासदार आणि एक आमदाराच्या फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठ्या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे परभणी शहरप जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी अचानक आपल्या पदाचा रातीनामा दिला आहे. प्राप्त माहितीनुसार ते लवकरच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. प्रताप देशमुख यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेता पवार यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे.
प्रताप देशमुख यांनी आपल्या राजीनाम्या वैयक्तिक कारणे दिली आहेत. प्रताप देशमुख हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटचे सहाकरी मानले जात होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून परभणीचे पहिले महापौर म्हणून काम केले आहे अणि ते मराठवाडा शिक्षण मंडळाचे सदस्य आहेत. प्रताप देशमुख लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत सामील होऊ शकतात. मात्र, या संंभाव्य पक्षांतराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. त्यामुळे आता केवळ काही दिवस शिल्लक असताना त्यापूर्वी मंत्रिमंडळ फेरबदल होणार का? मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल पुढे ढकललं जाण्याची शक्यता अधिकाधिक स्पष्ट होत आहे, पण या सगळ्यात शरद पवारांना त्यांच्या पसंतीचे मंत्रालय दिल्यास ते एनडीएमध्ये सामिल होतील का, यावर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुहात मोठी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, सध्या हे मंत्रालय शिवराज सिंह चौहान यांच्याकडे हे मंत्रालय आहे. माहितीनुसार, शरद पवारांनीर भाजप नेतृत्वाला आपली इच्छा कळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) काँग्रेसमध्ये विलीन होण्याचीही चर्चा आहे. राजकीय सूत्रांच्या मते, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमधील फूट आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची झालेली दुर्दशा यामुळे शरद पवार चिंतीत आहेत. त्यामुळेच शरद पवारांना एक सुरक्षित नवीन पक्ष स्थापन करायचा आहे.
सुप्रिया सुळे यांच्यासह आपल्या काही नेत्यांसाठीएक चांगला करार घडवून आणायचा आहे. भाजपकडे देण्यासारखे बरेच काही आहे, तर काँग्रेसची स्थिती नाजूक आहे. आता शरद पवारांचा निर्णय काय असेल हे पाहणे महत्वाचे असणार आहे. असा दावा केला जात आहे की, जर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) बाबत निर्णण घेतला नाही, तर पक्षात फूट पडू शकते.



Comments