ठाकरे बंधुंच्या युतीत शिलेदारांचेच विर्जन !
- Navnath Yewale
- Jun 23
- 2 min read
खासदार संजय राऊत, संदीप देशपांडे यांच्या जुंपली

.
महाराष्ट्राच्या राजकारणातील मनसे , शिवसेना (उबाठा) पक्षांच्या युतीबाबत चर्चांना उधान आले आहे. राजक ठाकरे यांनी सर्वप्रथम, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्हा भावांमधील वाद मी बाजूला ठेवायला तयार आहे, असे वक्तव्य करून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना युतीसाठी एकप्रकारे अलंगन दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही जनेतेच्या, कार्यकर्त्यांच्या मनात आहे ते हाईल असं म्हणत सकारात्मक प्रतिसाद दिला.
मात्र त्यानंतर युतीचा कॉल ‘पहेले आप, पहेले आप’ च्या हट्टामध्ये रखडल्याचे चित्र आहे. त्यात आता मनसेचे शराध्यक्ष संदीप देशपांडे आणि खासदार संजय राऊत यांच्यात एकमेकांवर तिखट शाब्दिक मार्यांनं युतीची शक्यता धुसर होत चालली आहे. देशपांडे राजकारणात नवीन आहेत, असा टोला राऊतांनी लगावला होता. त्याला देशपांडेंनी चोख प्रत्यूत्तर दिलं आहे.
संजय राऊतांच्या टिकेला उत्तर देताना देशपांडे म्हणाले की, होय आम्ही नवीन आहेत. पण कधी केम छो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत. जिलेबी अन फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही. मुस्लिमांची मत मिळवण्यासाठी वीस हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही. खरतर ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांध्ये मुंबईसह ठाणे, नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर मनोमिलन सुरू झाले आहे.
मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी अचानक राज ठाकरे यांची भेट घेतली आणि दोन्ही ठाकरेंच्या युतीबाबत साशंकता निर्माण झाली. त्यानंतरच देशपांडे सातत्याने ठाकरेंविरोधात आक्रमक वक्तव्य करत आहेत. युतीबाबत याआधी उत्साह का नाही दाखवला असा सवालही त्यांनी केला आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देशपांडेंना टोला लागावत युतीबाबत आशावाद व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीत केवळ 20 आमदार निवडून आलेल्या ठाकरे सेनेसाठी आगामी मनपा निवडणुक अस्तित्वाची लढाई आहे. मुंबई महापालिका हातातून जाऊ नये आणि ठाकरे बँ्रड जिवंत रहावा यासाठी उद्धव सेनेचा आटापीटा सुरू आहे. मात्र संदीप देशपांडेची वक्तव्य पाहता राज ठाकरे हे उद्धव यांना टाळी देण्याचं टाळत आहेत का? असा प्रश्न आहे. दरम्यान दोन्ही पक्षांच्या शिलेदारांकडून एकमेकांवर आगपाखड होत असल्याने ठाकरे बंधुंच्या युतीत शिलेदारांचेच विर्जन पडत असल्याच चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे.
コメント