top of page

ठाकरे बंधू एकत्र आले तरी, त्यात आमचा काय फायदा- जरांगे पाटील

ree

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला, त्यांनी अनेकदा उपोषण देखील केलं. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही त्यांची मुख्य मागणी आहे. दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. 29 ऑगस्ट रोजी मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. या सर्व पार्श्वभूमिवर बोलत असताना त्यांनी आज विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे.


दरम्यान,गेल्या काही दिवसापासून दोन्ही ठाकरे बंधू शिवेसना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर, आमचं पोट दुखायचं कारण नाही जुनी म्हण आहे की“ मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजे” कुठल्याही पक्षाचा असला तरी प्रत्येकाचे मत मुंबईत ठाकरेच असावेत असं होतं.


पण ते कशासाठी म्हणत होते? माहित नाही. दोन भावांनी एकत्र यावं, वेगळे लढले तरी पडतात मग एकत्र येऊन पडू द्या, पण लोकांची इच्छा आहे ना, दोन ठाकरेंनी एकत्र यांव मग त्यांनी एकत्र यावं. लोकांची इच्छा आहे त्यात आमचा काही फायदा नाही एकदा होऊन जाऊ द्या, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. राज ठाकरे आज गुजरातवार बोलत आहेत, मात्र पूर्वी यांनी गुजरातचा प्रचार केला, असंही यावेळी जरांगे पाटील म्हणाले.


मराठा आणि धनगर वेगळा नसून एकच आहे, आम्ही वेगळे नव्हतो आणि यापूढे नसणार, कारण नसताना मराठा समाजाच्या आरक्षणाला धनगरांचा विरोध नाही. असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Comments


bottom of page