डीजे च्या आवाजाने ‘आकरित’ घडलं !
- Navnath Yewale
- Apr 14
- 1 min read

डीजेच्या आवाजामुळे एका 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काढलेल्या मिरवणूकीत डिजे सुरु असताना हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
डीजे सुरू असताना अचानक तरुणाच्या नाकातून आणि कानातून रक्तस्त्राव झाला. त्यानंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली असून पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आंबेडकर जयंती निमित्त अनेक ठिक़ाणी भव्य मिरवणूक काढण्यात येते, नाशिकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंति निमीत्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत डिजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे नितिन रणशिंगे वय 23 वर्षे या मृत्यू झाला.
नाशिक शहरातील पेठ रोडवरील फुले नगर येथील तो रहिवाशी आहे. नाशिमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंति निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीत नितिन रणशिंगे हा सहभागी झाला होता. मात्र, डिजेच्या आवाजामुळे तो जागीच कोसळला. अचनाक त्याच्या नाकातून, कानातून रक्तस्त्राव सुरू झाला. उपस्थितांनी त्यास तातडीने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकार्यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले.
दरम्यान, नितिन यास क्षय रोगाचा त्रास असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. नितिनचा मृत्यू डिजेच्या मोठ्या आवाजामुळे झाला की, इतर आरोग्य विषयक कारणांमुळे झाला हे निष्पन्न होणे बाकी आहे.
Comments