डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण, कुटुंबीयांच्या नव्या दाव्याने ट्विस्ट
- Navnath Yewale
- Oct 25
- 2 min read

सातार्यातील फलटण मधील उपजिल्हा रुग्णालयातील बीडच्या महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहून हॉटेलमध्ये आत्महत्या केली. पीएसआय गोपाळ बदने याने चार वेळा अत्याचार केला व प्रशांत बनकर याच्या शाररिक व माणसीक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमुद केले. पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांनी पीएसआय यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. फरार आरोपींच्या शोधात पथक रवाना करण्यात आली होती.
प्रशांत बनकर यास पुण्यातील त्याच्या मित्राच्या फार्महाऊसमधून पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले. पीएसआय गोपाळ बदने याचे पंढरपूर येथे लोकेशन मिळाल्याने सातारा पोलिस पंढरपूर मध्ये त्याचा शोध घेत आहेत.
मतय डॉक्टर संपदा मुंडे यांच्या पार्थिवार पहाचे त्यांच्या बीड जिल्ह्यातील मुळ गावी कवडगाव (ता.वडवणी) येथे शोकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज दिवसभर राजकीय नेत्यांसह सामाजीक कार्यकर्त्यांनी भेट दिली. डॉक्टर संपदा आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांनी दोषींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. त्यातच आता डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांच्या दाव्याने प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. माहिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर लिहिलेली सुसाईड नोटबाबत तिच्या कुटुंबींयांनी मोठा खुलासा केला आहे. डॉक्टरच्या हातावरील सुसाईड नोट ही कुणी तरी लिहून ठेवली आहे आणि त्यामध्ये खाडाखोड केली आहे. तिची ही रायटिंग नसून प्रकरणाच्या पाठीमागे आणखी कोणीतरी आहे याची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी, डॉक्टरच्या बहिणीने केली आहे.
तसंच, या प्रकरणांमध्ये तिला वारंवार दबाव आणून खोटे पोस्टमार्टम
रिपोर्ट बनवून घेतले जात होते किंवा बनवण्यासाठी भाग पाडले जात होते. मात्र ती चुकीचं काम न करता चांगलं काम करत असताना कुणीतरी तिला दबाव टाकून चुकीच काम करण्यास भाग पाडत होते. असे देखील तिने सांगितले. जे कुणी यामागे आहे त्यांना शासन झाले पाहिजे अशी मागणी डॉक्टरच्या कुटुंबियांनी केली नाही.
आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या वडिलांनी आपल्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. ज्यांनी माझ्या मुलीला संपवला आहे त्यांना फाशी झाली पाहिजे. ज्यांनी माझ्या मुलीला संपवलं आहे त्यांना फाशी झाली पाहिजे. दरम्यान, सातर्याच्या फलटण शासकीय रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या माहिला डॉक्टरने गुरुवारी आत्महत्या केली. फलटणमधील हॉटेलमध्ये तिने गळफास घेत आयुष्य संपवले.



Comments