डॉक्टर मूर्ख, कबूतर शांतता प्रिय प्राणी; एक दोन जण मेल्यानं काय होत? - धर्मसभेत कैवल्य रत्न महाराजांची मुक्ताफळं
- Navnath Yewale
- Oct 12
- 2 min read

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये कबुतर खाण्याचा प्रश्न गाजतोय. या आंदोलनादरम्यान काही कबुतरांचा मृत्यू झालाय आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी आज ( 11 ऑक्टोबर) जैन धर्मियांकडून मुंबईमध्ये धर्मसभा भरविण्यात आली होती. या धर्मसभामध्ये जैनमूनी कैवल्य रत्न महाराज बरळल्याचे दिसून आले.
कबुतर शांतता प्रिय प्राणी आहे. आमचा धर्म सांगतो, दुसर्यासाठी मरायचं असेल तरी चालेल. रावणासमोर जटायू पक्षी समोर आला होता. त्यामुळे पक्षी किती महत्वाचा आहे. हे तेव्हापासून लोकांना माहिती आहे. एका पक्षासाठी श्रीमराम यांनी एवढं केलं. तर या रामाच्या भूमीमध्ये असं व्हायला नको आहे. मी डॉक्टरांना पण मूर्ख मानतो. एक-दोन जण मेल्यानं काय होतं? दररोज सामान्य माणूस मरतो, त्याचा सरकार विचार करत नसल्याचं विधान कैवल्य रत्न महाराज यांनी केलं. कबुतरखान्यावरून राजकारण सुरू आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा आज धर्मसभेत आले नाही. ही सरकारची मिलीभगत आहे. असा निशाना देखील कैवल्य रत्न महाराज यांनी साधला.
कबुतर हा प्राणी आहे. त्याची हत्या झाली म्हणजे शंकराची हत्या झाल्यासारखं आहे. सर्व सनातनी धर्म तुमच्यासोबत आहे. कबूतर आणि गाय राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा, ही माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, असं सुरेशजी महाराज म्हणाले.
आमच्यामध्ये एक मानलं जातं ते आमच्या प्राण्यांवर जर हल्ला झाल्यास त्याला उत्तर देतो. मग त्यामध्ये त्यांना वाचवण्यासाठी शस्त्र उचलले तरी चालतील. जे सत्तेत बसलेत त्यांना साधूसंतांनी बसवले. आम्ही घरोघरी पोहोचलो आणि प्रचार केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहे. आम्ही साधूसंत रस्त्यावर उतरू. असा इशाराही स्वरूपानंदजी महाराज यांनी दिला.
कबुतरांमुळे आजार होतो आतापर्यंत असं कधीही पुरावा आलेला नाही.प्राण्यांवरती महापालिका आयुक्त अन्याय करत आहेत. एवढ्या वर्षापासून कबूतर खाणे असतानाही यावरती कधी प्रश्न निर्माण झाला नाही आणि आताच प्रश्न निर्माण होतोय याचा अर्थ आजूबाजूला कोणाला डेव्हलपमेंट करायची आहे त्यामुळे हा मुद्दा समोर येतोय. नवीन ठिकाणी कबूतर खाणा हलविण्यासाठी हा काही एसआरए प्रोजेक्ट आहे का? यांची किंमत आगामी निवडणुकांमध्ये सरकारला मोजावी लागेल असा इशारा जैन धर्मियांनी दिला.



Comments