डॉ.बी.आर.आंबेडकर जयंती निमित्त दादरमधील अनेक मार्गांवर प्रवेश बंदी
- Navnath Yewale
- Apr 13
- 2 min read
चैत्यभूमीवरील गर्दीच्या नियोजनासाठी वाहतूकीत बदल

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उद्या (सोमवारी दि.14) मुंबईमधील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात येणार असल्याने अनुयायी 13 एप्रील रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात चैत्यभूमी, दादर येथे दर्शनासाठी जमणार आहेत. या पार्श्वभुकमीवर चैत्यभूमी व आसपासच्य परिसरात दि. 13 आणि 14 एप्रील या कालावधीत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत.
चैत्यभुमी, शिवाजीपार्क, दादर परिसराकडे जाणार्या रस्त्यांवरील वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करण्यात येणार आहे. गर्दी टाळण्यासाठभ मार्गांवर प्रवेश बंद करुन एकेरी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
एक दिशा मार्ग व वाहतूकीसाठी बंद रस्ते
एस.के बोले रोड हा सिद्धीविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगिज चर्च पर्यंत एक दिशा मार्ग राहिल. म्हणजेच पोर्तृगिज चर्च येथून एस.के. बोले रोडवर सिद्धीविनायकच्या दिशेने प्रवेश बंद राहिल. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग हा सिद्धीविनायक मंदिर जंक्शनपासून येस बँक पर्यंत वाहतुकीकरिता बंद राहील. स्थानिक रहिवाशांची वाहने शिवाजी पार्क रोड नं.5 म्हणजे पांडूरंग नाईक मार्गे जाऊ शकतील. रानडे रोड सर्व वाहतुकीकरिता बंद करण्यात येईल. ज्ञाणेश्वर मंदिर रोड, एस.व्हि. एस. रोड जंक्शन पासून दादर चौपाटीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद राहिल.
सर्व प्रकारची जड वाहने, माल वाहतुकीची वाहने माहिम जंक्शन येथून एल.जे. रोड मार्गे वळविण्यात येतील. वाहतुकीची कोंडी झाल्यास पर्यायी मार्ग दक्षिण वाहीनी पश्चिम द्रुतगीने बांद्रामार्गे दक्षिणेकडे जाणार्या वाहनांनी कलानगर जंक्शनकडे येथून डावे वळण घेऊन धारावी टी जंक्शन ते केमकर चौक पुढे 60 फुट रोड, कुंभारवाडामार्गे सायन रुग्नालय येथे उजवे वळण घेऊ शतात. अथवा बांद्रा-वरळी सागरी उड्डाणपुल मार्गे (सी.लिंक) दक्षिण मुंबईकडे प्रस्थान करावे. उत्तर वाहिनी वरुन कुलाबा तसेच सी.एस.एम.टी. मार्गे जाणार्या वाहनांनी उत्तर वाहिनी वरुन महालक्ष्म रेल्वे स्थानक जंक्शन कडून जाणार्या वाहनांनी पूर्व द्रूतगती महामार्गने दक्षिण मार्गस्थ व्हावे
मुंबईकडे जाणारी वाहतूक
पी. डीमेलो रोड, बॅरीस्टर नाथ पै. रोड, जकेरिया बंदर रोड, आर.ए.के. मार्ग यांचा वापर करून माटुंगा येथील अरोरा ब्रिजखाली उजवे वळण घेवून पुढे सायन हॉस्पीटल जंक्शन मार्गे पुढे मार्गक्रम करावे. अथवा बांद्रा- वरळी सागरी उड्डाणपूल(सी.लिंक) मार्गे उत्तर मुंबईकडे प्रस्थान करावे. डॉ. ई. मोजेस रोड, रखांगी चौक येथे उजवीकडे वळण घेवून सेनापती बापट मार्गे पुढे मार्गक्रमण करावे. या वाहनांनी वडाळा ब्रिजचा वापर करून बरकत अली नाका, बी.पी.टी. कॉलनी, पूर्व मुक्तमार्गाचा वापर करावा रस्त्यांवर दोन्ही बाजूस नो-पार्किंग राहिल. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग बाबासाहेब वरळीकर चौक (सेन्च्युरी जंक्शन) ते येस बैंक जंक्शन संपूर्ण रानडे रोड, केळूस्कर रोड दक्षिण व उत्तर, ज्ञाणेश्वर मंदिर रोड
वाहने पार्क करण्यास उपलब्ध असलेले रस्ते
संपूर्ण सेनापती बाबट मार्ग- माहिम ते दादर, इंडिया बुक फायनांन्स सेंटर , एलफिन्स्टन, मुंबई (पीपीएल)
कोहिनूर स्क्वेअर कंपाऊंड, शिवाजीपार्क, दादर (पीपीएल)
कामगार मैदान, सेनापती बापट मार्ग
इंडिया बुक सेंटर, ज्युपीटर मिल कंपाऊंड, एलफिन्स्टन (पीपीएल) पाच गार्डन, आर.ए.के. रोड असे नियोजन करण्यात आले आहे.
Comments