तपासाठी कृष्णा अंधळेला अटक करा - धनंजय देशमुख
- Navnath Yewale
- Apr 9
- 1 min read

संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येची मा. न्यायालयात सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला चार महिणे लोटले असले तरी अद्याप मुख्य आरोपीं पैंकी कृष्णा अंधळे हा फरार आहे. तपास यंत्रणेच्या सीआयडी, एसआयटी, पोलिस यंत्रणेला गुंगारा देणारा कृष्णा अंधळे याचा थांग पत्ता लागलेला नाही. कृष्णा अंधळे याच्याकडे पुरावे असण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यास तात्काळ अटक करण्याची मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.
संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येचा मुख्य सुत्रधार वाल्मिक कराड व त्याच्या इतर साथीदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडसह इतर साथीदार जिल्हाकारागृहात कैंदेत आहेत. मात्र, हत्या घडवून आणल्यापासून कृष्णा आंधळे हा मुख्य आरोपी पैंकी एक चार महिण्यापासून फरार आहे. कृष्णा आंधळे याच्यावर परळी, केज़, धारुर पोलिसा ठाण्यात यापूर्वीच मारहाण, धमकी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. खुनाच्या प्रयत्न गुन्ह्यात फरार राहिलेला कृष्णा अंधळे सर्रास पोलिस कर्मचार्यांसोबत फिरत होता. यावरुनच कृष्णा अंधळे हा सराईत असल्याचा यापेक्षा वेगळ्या पुराव्याची गरज नाही.
संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्याचे महत्वाचे पुरावे कृष्णा अंधळे याच्याकडे असल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यास तात्काळ अटक करण्यात यावी. याशिवाय आमदार संदिप क्षिरसागर यांनी सुरवातीपासूनच कृष्णा अंधळे जीवंत आहे का? अशी शंका उपस्थित केली. आमदार धस यांनी कृष्णा आंधळे यास कुुटूंबातील सदस्यांची तसुभरही फिकीर नसल्याचे सांगत तो लवकर ताब्यात येईल असा विश्वास व्यक्त केल होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची कडी पूर्ण करण्यासाठी कृष्णा अंधळे याची अटक महत्वाची ठरणार आहे.
Comments