तब्बल 1.25 कोटी लाडक्या बहिणीं ठरल्या अपात्र , सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र
- Navnath Yewale
- 6 days ago
- 2 min read

मुंबई : राज्य सरकारच्या महत्वकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून राजकारण तापलं आहे. केवायसी आणि इतर कारणांमुळे लाखो महिला योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. आधी योजनेतील लाभ घेतलेल्या महिलांना अपात्र ठरवल्यावरुन विरोधकांनी सत्ताधार्यांवर टीकास्त्र डागलं आहे. सरकार योजना बंद करण्याच्या विचारात असल्याचा अरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्याच दरम्यान शरद पवार गट राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी योजनेसंदर्भात धक्का दायक खुलासा केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहिण योजना चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे यंदाच्या हप्त्यात 50 लाखांहून अधिक लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच नाहीत. या योनेतून 80 लाख महिलांना विविध कारणास्तव वगळण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार आवाज उठवला आहे.
निवडणुकांवेळी सरकारने अपात्रेच्या निकषाला कात्री लावली होती, मात्र आता निकष देवून लाडक्या बहिणींना योजनेतून अपाक्ष करण्यात येत आहे. याचदरम्यान सप्रिया सुळे यांनी नवा खुलासा केला आहे. योजनेतून 80 लाख नाही तर जवळपास 1.25 कोटीहून अधिक महिलांना अपात्र करण्यात आल्याचा खुलासा त्यांनी पोस्टद्वारे केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरुवातील 2.37 कोटी महिलांना लाभ देण्यात आल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला होता. डिसेंबर 2024 पर्यंत या महिलांना तब्बल 17 हजार 505 कोटींपेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आल्याची माहिती देखील सरकारनं दिली. पुढे या योजनेअंतर्गत आभार्थी संख्या 2.46 ते 2.48 कोटींपर्यंत गेल्याचे सांगण्यात आले, जो या योजनेचा उच्चांक होता.
त्यानंतर ई- केवायसी बंधनकारक करण्यात आली. आता सुमारे 1.66 कोटी महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार असल्याचे समोर येत आहे.
लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरील प्रत्यक्ष आकडे पाहिले असता अर्जांची आणि मंजूर लाभार्थ्यांची संख्या आणखीच कमी दिसत आहे. पोर्टलवर एकूण अर्जांची संख्या फक्त 1.12 कोटी तर मंजूर अर्जांची संख्या फक्त 1.06 कोटी इतकीच दिसत आहे. म्हणजे डिसेंबरइद 2024 मधील आकडेवारी गृहीत धरली तर तब्बल 1.25 कोटीहून अधिक महिलांना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आल्याचं दिसत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.



Comments