top of page

... तर मी खासदारकीचा राजीनाम देईल, बजरंग सोनवणे का म्हणाले





बीडचे खासदार बजरंग सोनावणे कायम सोशल मिडियावर चर्चेत आहेत. नुकत्याच बिंदुनामावलीच्या प्रश्नावर आयोजीत पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्हापरिषद सभाती कालावधीत दोषी अढळलो तर थेट खासदारकीचा राजीनामा देईल असे म्हणत खळबळ उडवून दिली आहे.

हे ही वाचा :

राष्ट्रवादी (श.प.गट) बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्ह्यातील बिंदूनामावली रोस्टर चौकशी प्रकरणी पत्रकार परिषद आयोजीत केली होती. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती कार्यकाळात बजरंग सोनवणे यांनी बिंदूनामावलीमध्ये गैरप्रकार केल्याचा मंत्री पंकजा मुंडे यांच्या कथीत आरोपा विषयी खासदार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांनी फोन करुन चुकून तुमचे नांव आल्याचे सांगितले होते.


तसा मला पंकजा मुंडे यांचा फोन आल्याने मी त्यावर काही प्रतिक्रीया दिली नाही. बिंदूनामावलीच्या गैरप्रकारात माझा कसलाही संबंध नाही. बिंदूनामावलीच्या गैरप्रकारामुळे खुल्या प्रवर्गावर मोठा अन्याय होत असल्याचं खासदार सोनवणे म्हणाले.



दरम्यान, बिंदूनामावली रोस्टरचे पालन होत नसल्याने जिल्ह्यात शासनाच्या विविध विभागातील कर्मचार्‍यांचा जातिनिहाय समतोल राखला जात नसल्याने याचा परिणाम विकासांवर होत असल्याचे आरोप आमदार सुरेश धस, सामाजीक कार्यकर्त्या अंजली दमानिया, तृप्ती देसाई यांनी केला आहे.


जिल्हा परिषद, महसूल, पाणीपुरवठा, गृह विभाग आदी प्रशासकिय विभागात एकसमान स्थिती असल्याचाही आरोप सत्ताधारी, विरोधाकांकडून केला जात आहे. दरम्यान, पालकमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथील त्यांच्या शासकिय निवास्थानी आयुक्तांसह सबंधीत अधिकार्‍यांची बैठक घेवून बीडच्या बिंदूनामवली बाबत चौकशीचे आदेश देऊन अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या.


त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त दिलीप गावडे यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली. चौकशी समितीमार्फत जिल्ह्याच्या बिंदूनामावलीची चौकशी करण्यात आली असून लवकरच अहवाल सादर करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील सरकारी बाबुंमध्ये खळबळ उडाली आहे.


त्या पार्श्वभुमिवर आज खासदार बजरंग सोणवणे यांनी अयोजीत पत्रकार परिषदेत बिंदूनामावली रोस्टरच्या गैरप्रकारामुळे खुल्या प्रवर्गावर अन्याय होत असल्याचे सांगत गैरप्रकारात माझा तसुभरही संबंध अढळला तर मी जिल्ह्यातील जनतेची माफी मागून थेट खासदारकीचा राजीनामा देईल असं ठणकावून सांगत आपला बिंदू नामावली रोस्टर प्रक्रियेच्या गैरकारभारत संबंध नसल्याचे जाहिर केले.


त्याचबरोबर येत्या एक ते दिड महिन्यात बीड पर्यंत रेल्वे येणार आहे. आम्ही परळीमधील रेल्वे स्टेशन संदर्भात अडचणी दूर केल्या आहते. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले, वाल्मिक कराड परळीत बसून सर्व चालवत होता. असा दावाही खासदार बजरंग सोनवणे यांनी केला. पालकमंत्री अजित पवार जिल्ह्यात चुकीचं काम करु देणार नाहीत असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Comments


bottom of page