तहव्वूर राणाची कोर्टाला विनंती; माझ्या नावाचा वापर करुन प्रसिद्धी मिळवणारा वकील मला नको.
- Navnath Yewale
- Apr 12
- 1 min read

माझ्या खटल्याचा आणि नावाचा वापर करुन प्रसिद्धी मिळवणारा वकिल मला नाको, अशी अजब मागणी मुंबइ हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणा यानं दिल्लीतील विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
यावेळी एनआयएन त्याची20 दिवसांची कोठडी मागितील होती, पण कोर्टानं 18 दिवसाची कोठडी मान्य केली. तसंच या काळातील आपली चौंकशी ही एनआयएच्या मुख्यालयात करण्यात यावी, अशी मागणीही त्यानं केली.
दरम्यान, विशेष एनआयए न्यायाधीश चंदरजीत सिंह यांनी आपल्या आदेशात म्हटलं की, आरोपीनं निवेदन दिलं आहे की, असा कुटलाही वकील मला नका देऊ, जो प्रसिद्धीसाठी माझ्या केसचा वापर करेन मग यामध्ये विधी सेवा प्रधिकरण अधिनियम 1987 नुसार वकील नियुक्त करण्यात आला असला तरी. पण तरीही आरोपींची मागणी स्वीकारण्यात आल्याचंही कोर्टानं यावेळी सांगितलं.
यावेळी विशेष एनआयए कोर्टानं निर्देश दिले की, विधी सेवेचे वकील माडियाशी कोणतीही चर्चा करणार नाहीत. मग तो प्रिंट डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक मिडिया असं काहीही असो. याशिवाय जर वकिलांकडं असलेली माहिती ही आधीपासूनच मिडियाकडं नसेल तर ती त्यांना दिलीही जाणार नाही.
दरम्यान, कोर्टाच्या आदेशात हे देखील म्हटलंय की, राणाला आपल्या वकिलांना निर्देश देण्यासाठी सॉप्ट टिप पेन आणि कागद देण्यात येईल. कारण तो स्वत:ला जखमी करुण घेऊ शकणार नाही. तसंच कायदेशीर कारवाईत सहजता राहील.
Comments