top of page

तारकेश्वर गडाच्या महंत स्वत:वर हल्ला प्रकरणी शिष्याची धक्कादायक माहिती

बीड : बीड, अहिल्यानगर जिल्ह्यासह पाथर्डी परिसरात मोठा भक्त परिवार असलेल्या तारकेश्वर गडाचे महंत अदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वत:वरच वार केल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाराजांनी तारकेश्वर गडावर स्वत:च्या खोलीत गुप्तांगावर शस्त्रमाने वार केले, खोलीतच महाराज रक्तबंबाळ अवस्थेत होते. ही बाब लक्षात येताच त्यांच्या भक्तांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवलं. मात्र महाराजांनी स्वत:च्या गुप्तांगावर वार का केले असा प्रश्न उपस्थित होत आहे. अखरे घटनेच्या 24 तासानंतर त्यांच्या शिष्याने या संदर्भात माहिती दिली आहे.


अहिल्यानगर जिल्ह्यातील तारकेश्वर गडांवर लाखो भक्तगण जोडले गेलेले आहेत. आता याच गडाच्या महंतांनी स्वत:वार केल्याची गंभीर घटना समोर आल्यानं मोठा धक्का बसला आहे. सध्या महंत आदिनाथ शास्त्री महाराजांवर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. मात्र याचवेळी महाराजंनी स्वत:वर वार का केले याबाबत काही माहिती समोर आली आहे. अलीकडे नेहमीच संत-महंतांना त्रास दिला जात आहे. बाबांनी असं करायला नको होतं. बाबांना त्रास देणारा जो काणी नराधम असेल त्याचा शोध घ्यायला हवा. यापूर्वीही अनेक महाराजांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला.


धार्मिक आदरस्थान असलेल्या व्यक्तिमत्वांवर त्रास देणार्‍यांची टोळी सक्रिय झाली असून समाजाने त्याचा बंदोबस्त करायला हवा. आदिनाथ महाराजांच्या प्रकरणात काही संशयित आहेत. त्यांचे सीडीआर काढा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. बाबा कधीच याबाबत बोलणार नाहीत, त्यामुळे या प्रकरणातील आरेपीला पकडणं अत्यंत गरजेचं आहे.


बीड जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेल्या तारकेश्वर गड या ठिकाणी ते महंत काम पाहतात. बीडच्या आष्टी तालुक्यातील महिंदा गावात तारकेश्वर गड अध्यात्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. या घटनेनंतर काळजीत पडलेल्या भक्तांना स्वत: महाराजांनी संदेश देत दिलासा दिला आहे. माझी तब्येत आता चांगली आहे. कोणीही काळजी करु नका, मी लवकरच गडावर येणार आहे, असा संदेश आदिनाथ शास्त्री महाजरांनी आपल्या भक्तांना दिल्याने त्यांच्या अनुयायांमध्ये काहीसा दिलासा व्यक्त केला जात आहे.

अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर एक शस्त्राक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.


अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होते. यावेळी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. काळजी करण्याचे कारण नसून भक्तांनी महाराजांना आठ दिवस भेटणे टाळावं जणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही असं आवाहन डॉक्टर तन्वर यांनी केलं आहे.

Comments


bottom of page