तीन कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या माओवाद्याला कंठस्ना
- Navnath Yewale
- Jun 18
- 1 min read

तेलंगणामध्ये जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 कोटी रुपयांचं बक्षीस असलेल्या नक्षवाद्याचवा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील मारडपलीच्या घनदाट जंगलात ही चकमक सुरू होती. आज सकाळी माओवाद विरोधात झालेल्या चकमकीत तीन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
या चकमकीमध्ये माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य आणि तब्बल तीन कोटी रुपयांचे बक्षीस असलेला जहाल माओवादी गजर्ला रवी याला ठार कण्यात जवानांना यश आलं आहे. त्याला ठार केल्यामुळे माओवादी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. मारडपलीच्या दुर्गम वनक्षेत्र भागात जवान आणि माओवाद्यांमुळे मोठी चकमक सुरू आहे.
या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून, तीन माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दरम्यान, या चकमीत ठार झालेली आणखी एक महत्वाची माओवादीही माहिला अहो. या महिलेचं नाव अरुणा आहे. तिच्यावरही 50 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आलं होतं.
コメント