ती किंचाळली अन..तो फसला; गर्लफ्रेंडला हॉस्टेलमध्ये खोलीवर नेण्याचा प्लॅन पण झाली एक चुक
- Navnath Yewale
- Apr 12
- 1 min read

एक व्हिडीओ जो बघून तुम्हालाही हसायला येईल. एका खासगी विद्यापीठात शिकत असलेल्या तरुणाने त्याच्या गर्लफे्ंरडला हॉस्टेलमध्ये घेऊन जाण्याचा प्लॅन केला. मुलांच्या हॉस्टेलमध्ये मुलींना प्रवेश नसल्याने त्याने एक शक्कल लढवली. पण, तरुणीच्या एका चुकीने त्याचे बिंग फुटले.
जो व्हिडीओ व्हायरल होतोय हरयाणातील सोनीपत शहरातील आहे. एका खासगी विद्यापीठात तरुण शिक्षण घेत आहे. तो विद्यापीठातच मुलांच्या वसतिगृहात राहायला आहे. त्याला त्याच्या गर्लफ्रेंडला हॉस्टेलला आणायचे होते, पण मुलांच्या वसतिगृहात मुलींना प्रवेश नसल्याने त्याने एक प्लॅन बनवला. तो म्हणजे गर्लफ्रेंडला एका मोठ्या सुटकेसमध्ये लपवून आणण्याचा.
ती किंचाळली अन तो फसला
तरुणाने गर्लफ्रेंडला एका मोठ्या सुटकेसमध्ये बसवले आणि सुटकेस घेऊन तो वसतिगृहात आला. वसतिगृहात प्रवेश केल्यानंतर ओढत असताना सुटकेस एका ठिकाणी आदळली आणि झटका बसला. त्यामुळे सुटकेसमध्ये बसलेली तरुणी जोरात किंचाळली. मुलीचा आवाज ऐकल्यानंतर वसतिगृहाचा सुरक्षारक्षक खडबडून जागा झाला. त्यानंतर त्यांने तरुणाला थांबवले. त्याला सुटकेस उघडण्यास सांगितले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे इतर कर्मचारीही तिथे आले. त्यानंतर सुटकेस उघडण्यात आली, त्यावेळी त्यामुध्ये तरुणी बसलेली असल्याचे दिसले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कर्मचारी सुटकेस उघडताना दिसत आहेत. आजूबाजूला सुरक्षा रक्षक आणि काही कर्मचारीही दिसत आहेत. तरुणाची गर्लफ्रेंड त्याच विद्यापीठात शिकत आहे की, बाहेर दुसर्या ठिकाणी शिकायला आहे या बद्दल माहिती कळू शकली नाही.
Comments