तुळजापूर- औसा महामार्गावर भीषण अपघात, भाजपच्या बड्या नेत्याचा मृत्यू
- Navnath Yewale
- May 26
- 1 min read

तुळजापूर- औसा महामार्गावर कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे, या अपघातात भाजपचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचा मृत्यू झाला आहे. आर. टी. देशमुख हे माजलगांव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर- औसा महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचं निधन झाल्याची दुर्दैवी यांचं निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आर. टी. देशमुख हे माजलगावचे माजी आमदार होते. समोर आलेल्या माहितीनुसार महामार्गावरील बेलकुंड उड्डाण पुलावरून जात असताना त्यांची कार रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे स्लिप झाली, कार स्लिप झाल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. कार सुरक्षा कठडा तोडून चार वेळेस पलटी झाली, या अपघातामध्ये आर. टी. देशमुख हे गंभीर जखमी झाले होते, त्यांना लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

कार स्लिप झाल्यानं अपघात
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर - औसा महामार्गावर हा अपघात झाला आहे. पावसाच्या पाण्यामुळे बेलकुंड उड्डाण पुलावर कार स्लिप झाली, अनियंत्रीत झालेली कार सुरक्षा कठडा तोडून चारवेळेस पलटी झाली, या भीषण अपघातामध्ये देशमुख गंभीर जखमी झाले होते, त्यांना उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आहे. आर. टी. देशमुख यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोण होते आर. टी. देशमुख?
आर. टी. देशमुख हे भाजपचे माजी आमदार आहेत. ते 13 व्या विधानसभेत माजलगाव विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताने वियी झाले होते. त्यांच्या राजकारणावर गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव होता, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती, त्यांनी पक्षांतर्गत अनेक महत्वाच्या पदावर काम केलं. मनमिळावू, प्रेमळ आणि सर्वांना सहकार्य करणारा असा त्यांचा स्वभाव होता, त्यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Comentários