तुषार आपटेचं भर चौकात मुंडके छाटा, भाजपने स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करताच कालीचरण महाराज कडाडले.
- Navnath Yewale
- Jan 10
- 1 min read

नाशिक: बदलापूरमधील एका शाळेतील लहान मुलींवर अत्याचार करण्यात आला होता. या अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या तुषार आपटे याला भाजपाने थेट स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती केले. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तुषार आपटेच्या नियुक्तीला कालीचरण महाराजांनीही विरोध केला आहे. ‘तुषार आपटेला भार चौकात उभं करा आणि त्याचं मुंडके छाटा, असे विधान त्यांनी केले आहे.
बदलापूर-कुळगाव नगरपरिषदेची काही दिवसांपूर्वी निवडणूक पार पडली. या निवडणुकीनंतर भाजपाने घेतलेल्या एका निर्णयाने संतापाची लाट उसळली. बदलापूर येथील शाळेत लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीलाच भाजपाने नगरसेवकपदी नियुक्ती केले.
बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी असलेल्या तुषार आपटे याला भाजपने स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केले. त्यावर आता कालीचरण महाराजांनी मुंडके छाटा अशी मागणी केली. नाशिकमध्ये कालीचरण महाराज म्हणाले, “ तुषार आपटेला भर चौकात उभं करा आणि त्याचे मुंडके छाटले पाहिजे. आरोप सिद्ध होत असतील तर कारवइाृ केलीच पाहिजे.”
“ आमचा उद्देश धर्म राज्याचा आहे. जे हिंदू हिताचे आचरण करतील, त्याला मतदान करा. दोन असतील, तर जो जास्त हिंदू आचरण करेल त्याला मतदान करा. लोकांनी आपापल्या अनुभवावर उमेदवारांना निवडावे. हिंदुंचे विभाजन होत आहे. जे धर्म रक्षण करतात, त्यांना मतदान करा,” असे विधान कालीचरण महाराजांनी केले. “ कोणत्याही देशात हिंदू सुरक्षित नाही. ही स्थिती भारतात देखील होऊ शकते. हिंदूंच्या रक्षणासाठी राजकारणाचे हिंदुकरण करणे महत्वाचे आहे. हिंदू मतदार हा आमचा अजेंडा आहे. जो भारत मातेचा उत्सव करेल त्याला मतदान करा.” असंही ते म्हणाले.



Comments