... तोपयर्तं मी आरसीबीसाठीच खेळेल- कोहली
- Navnath Yewale
- 6 days ago
- 2 min read

जर तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये चांगले खेळलात, तर तुम्ही जगात कुठेही जाल तरी लोक तुमचा आदर करतील. जर तुम्हाला जगात क्रिकेटमध्ये आदर मिळवायचा असेल, तर केसोटी क्रिकेट खेळ आणि तुमचे सर्वस्व पणाला लावा. आयपीएलचे विजेतेपद जिंकण्यासाठी 18 हंगामांची वाट पाहत असताना, विराट कोहलीला आपले अश्रू आवरता आले नाहीत. परंतु पुन्हा एकदा त्याने कसोेटी क्रिकेटवरील आपले प्रेम व्यक्त केले आणि म्हटले की, तो अजूनही पारंपारिक क्रिेकेटला टी-20 पेक्षा पाच स्थानांनी वर मानतो. तो म्हणाला की, जापेर्यंत आयपीएल येळेतो, तापर्यंत तो फक्त आरसीबीकडूनच खेळेल.
विरोटने इंस्टाग्रामवर टीमसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. त्याने लिहिले, ‘या संघाने स्वप्न शक्य केले. असा हंगाम जो मी कधीही विसरणार नाही. गेल्या अडीच महिन्यांत आम्ही या प्रवासाचा पुरेपूर आनंद घेतला आहे. हे आरसीबी चाहत्यांसाठी आहे ज्यांनी सर्वात वाईट काळातही आम्हाला कधीही सोडले नाही. हे त्या सर्व वर्षांच्या ह्दय विकाराच्या आणि निराशेच्या दु:खासाठी आहे. या संघासाठी मैदानावर खेळण्यासाठी तुुम्ही केलल्या प्रत्येक प्रयत्नसाठी आहे. मला कसोटी क्रिकेटबद्दल खूप आदर आहे. कोहली म्हणाला, ‘मी तरुणांना फक्त कसोटी क्रिकेटचा आदर करण्याचे अवाहन करेन. जर तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये चांगले खेळलात, तर तुम्ही जगात कुठेही जाल, जरी लोक तुमचा आदर करतील. जर तुम्हाला जगात क्रिकेटमध्ये आदर मिळवायचा असेल, तर कसोटी क्रिकेट खेळा आणि तुमचे वर्चस्व पणाला लावा.
20 व्या षतकाचा दुसरा चेंडू जोश हेझलवूडने टाकला आणि कोहलीचे डोळे अश्रूंनी भरले. कोहलीला मोटेरा मैदानावर किस करताना पाहून त्याचे चाहतेही आनंदाश्रू रोखू शकले नासते. यावर्षी आयपीएल 18 वर्षांचे झाले आणि या जेतेपदासह, कोहलीची उंची आणखी वाढली आहे. विजयानंतर कोहली म्हणाला, हा संघ जितका चाहत्यांचा आहे तितकाच तो संघाचा आहे. ‘ 18 सत्रांचा दिर्घ कालावधी मी माझे तारुण्य,श्रेष्टत्व आणि अनुभव, सर्वकाही या संघाला दिले. मी प्रत्येक सत्र जिंकण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे जे काही होते ते मी दिले. अंतिम सामन्यानंतर, कोहलीने पत्नी अनुष्काला मिठी मारली, अखेर जेतेपद जिंकणे हे अविश्वसनीय वाटते. असा दिवस येईल असे कधीच वाटले नव्हते. शेवटचा चेंडू टाकला तेव्हा मी खूप भावनिक झालो. मी माझी सर्व शक्ती त्यात ओतली आणि ही एक अद्भूत भावना आहे. त्यावेळी त्याचे जवळचे मित्र सीमारेषेजवळ उभे होते.
कोहली त्याबद्दल म्हणाला, एबीडीने या संघासाठी जे केले आहे ते अद्भूत आहे. मी त्याला सांगितले की, हा विजय जितका आपला आहे तितकाच त्यांचाही आहे. तुम्हीही या उत्सवात सहभागी व्हावे अशी माझाी इच्हा आहे. चार वर्षापूर्वी निवृत्त झाल्यानंतरही, तो सर्वाधिक वेळा सामनावीर ठरला आहे. त्याचा लीगवर, संघावर आणि माझ्यावर किती प्रभाव आहे. हे यावरून दिसून येते. तो व्यासपीठावर असण्यास पात्र आहे. एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर, समालोचक मॅथ्यू हेडन यांनी हे विजेतेपद कुठे ठेवतो असे विचारले असता, कोहली म्हणाला, हे देखील वर आहे. गेल्या 18 वर्षात मी या संघाला सर्वकाही दिले आहे.या संघासोबत राहिलो. मी संघासोबत राहिलो आणि संघ माझ्यासोबत राहिला. मी नेहमीच या संघासोबत जिंकण्याचे स्वप्न पाहिले. माझे मन आणि आत्मा बेंगळुरुमध्ये आहे. जोपर्यंत मी आयपीएल खेळत आहे, तोपर्यंत मी फक्त बंगळुरुसाठीच खेळेन.
Comentários