थायलंडची ओपल सुचाता बनली 2025 मिस वर्ल्ड
- Navnath Yewale
- Jun 1
- 2 min read

थायलंडची ओपल सुचाता चुआंगश्री हिने मिस वर्ल्ड2025 चा किताब जिंकला आहे. हैदराबादमध्ये झालेल्या 72 व्या मिस वर्ल्डच्या अंतिम समारंभाच्या मंचावर ‘मिस वल्ड’ 2025 थायलंड ओपल सुचाता चुआंगश्री ही घोषणा होताच सुचाता हिच्या डोळ्यात आंनदाश्रू आले. मिस वर्ल्ड 2024 क्रिस्टीना स्ेटजवर आली आणि तिने सुचता हिच्यावर मिस वर्ल्ड 2025 चा मुकुट ठेवला सुचाता ही थायलंडमधील मिस वर्ल्ड बनणारी पहिली मॉडेल आहे.
मिस वर्ल्ड किताब जिंकणारी ओपल सुचाता
शनिवारी हैदराबादमध्ये झालेल्या मिस वर्ल्ड 2025 च्या अंतिम फेरीत एक कठीण स्पर्धा पाहायला मिळाली. इथिओपियाचा हसेट डेरेज हा पहिला उपविजेता ठरला. पोलंडची माजा क्लाज्दा दुसरी उपविजेती ठरली. दरम्यान, मार्टिनिकच्या ऑरेली जोआकिमनेही पहिल्या चारमध्ये स्थान मिळविले. 2025 तध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंबणारी ओपल सुचाता कोण आहे? फुकेतमध्ये जन्मलेल्या ओपल सुचाता हे थम्मासात विद्यापीठात राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचे विद्यार्थी आहेत आणि एक मॉडेल आहेत. थाई, इंग्रजी आणि चिनी या तीन भाषांमध्ये प्राविण्या असलेल्या सुचात यांचे शालेय शिक्षण त्रिम उदोम सुक्सा येथून घेतले.
सुजाताचा स्तनाच्य कर्करोगाशी काय संबंध आहे? याशिवाय, ओपल सुचाता महिला सक्षमीकरण आणि मानसिक आरोग्यावर जागक्ष्कता मोहिम राबवत आहेत. त्या स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरुकता मोहिमांमध्ये भाग घेत आहेत. वयाच्या अवघ्या 16 व्या त्यांच्या स्तनाला एक गाठ आढळली, ती किरकोळ होती. पण त्यामुळे त्यांना स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरुकता पसरवण्याची प्रेरणा मिळाली. भारताच्या नंदिनी गुप्ताचे स्वप्न भंगले: यावेळी जगभरातील 108 सुंदरींनी मिस वर्ल्ड 2025 मध्ये भाग घेतला. नंदिनी गुप्ता हिने मिस वर्ल्ड 2025 मध्ये ीारताचे प्रतिनिधीत्व केले आणि टॉप 20 मध्ये स्थान मिळवले. नंदिनी देखील टॉप आठमध्ये पोहोचली. जरी नंदिनी आशिया आणि ओशनिया श्रेणीत टॉप 5 मध्ये स्थान मिळवले असले तरी, ती त्यातही टॉप 2 मधून बाहेर पडली.
अभिनेता सोनू सूदही सन्मानीत:
अभिनेता सोनू सूदला मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने सन्मानीत करण्यत आले. मिस वर्ल्ड 2016 स्टेफनी डेल व्हॅले हिने 72 व्या मिस वर्ल्डच्या अंतिम फेरीचे आयोजन केले. मिस वर्ल्डच्या ज्युरीमधये अभिनेता सोनू सूद मिस वर्ल्ड अध्यक्ष ज्यलिया मोर्ले सीबीई आणि मिस वर्ल्ड क्रिस्टीना पिस्झकोवा 2024 यांच्यासह इतर प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश होता. यावेळी अभिनेता सोनू सूदला मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि सुपरस्टार चिरंजीवी यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होते.
Comentarios