दहशवादी हल्ल्याची धमकी, तिरुपती हाय अलर्टवर यंत्रणांची मंदिर, न्यायालय परिसारात शोधमोहीम
- Navnath Yewale
- Oct 18
- 1 min read

आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्हा शुक्रवारी दहशवादी धमकीने हादरला. दहशतवादी धमक्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे आणि अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद सामग्री जप्त करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी आयएसआय आणि माजी एलटीटीई दहशतवादी तिरुपतीच्या चार भागात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत आहेत आणि त्यांची तयारी करत आहेत असा धमकी देणारे ईमेल पाठवले.
इमेलद्वारे धमकीनंतर, बॉम्ब शोध नाशक पथकाने तिरुपतीच्या अनेक भागात सखोल शोधमोहिम राबवली. सतर्क पोलिसांनी तिरुपतीमधील आरटीसी बस स्टँड, श्रीनिवासम, विष्णू निवासम, कपिला तिरुथम, आणि गोविंदराजुला स्वामी मंदीर परिसराची तपासी केली. पोलिसांनी न्यायाधीशांच्या निवासी संकुलाची आणि न्यायालय परिसराचीही तपासणी केली. या महिन्याच्या 6 तारखेला मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू यांच्या तिरुपती भेटीच्या पार्श्वभूमिवर कृषी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर तपासणी करण्यात आली.
त्याचप्रमाणे, बीडी पथकांनी तिरुपतीमधील पद्मावती अम्मावरी मंदिर, तिरुमला आणि श्रीकालहस्ती मंदिराची तपासणी केली. तिरुपतीमध्ये बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर भाविक चिंता व्यक्त करत आहेत. पोलिसांच्या साखोल शोधमोहीमेदरम्यान कोणताही बॉम्ब अथवा इतर संशयास्पद वस्तू सापडली नाही .



Comments