top of page

दहावी बोर्ड परीक्षेत मोठे बदल; दहावीची परीक्षा दोनदा होणार!



2026 पासून दहावी बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या निकषांना सबीएसईने मान्यता आहे. सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेईल, पहिला टप्पा फेब्रूवारीमध्ये आणि दुसरा टप्पा मे मध्ये असेल अशी माहिती सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी दिली आहे.


दहावी बोर्ड परीक्षेत 2026 पासून मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार

दहाविच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षेच्या पहिल्या टप्यात उपस्थित राहणे अनिवार्य आहे, दुसरा टप्पा ऐच्छिक असेल. शिवाय अंतर्गत मूल्यांकन फक्त एकदाच केले जाणार आहे. दरम्यान, निर्णयानंतर, विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्याची संधी मिळणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्यांचे गुण पहिल्या टप्यात कमी असतील, तर तो दुसर्‍या टप्यात चांगली कामगिरी करून सुधारणा करू शकेल.

केंद्रीय माध्यामिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीच्या वर्षातून दोनवेळा बोर्ड परीक्षा घेण्याच्या नियमांना मान्यता दिली आहे. ही नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिफारस करण्यात आली आहे. सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज म्हणाले की, पहिला टप्पा फेब्रूवारीमध्ये आणि दुसरा मेमध्ये घेण्यात येईल. दोन्ही टप्यांचे निकाल अनुक्रमे एप्रिल आणि जूनमध्ये केले जातील. पहिल्या टप्यात विद्यार्थ्यांना बसणे अनिवार्य असेल, तर दुसरा टप्पा ऐच्छिक असेल.

विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान आणि भाषा या तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी सुधारण्याची परवानगी असेल. मंजूर केलेल्या नियमांनुसार, हिवाळी सत्रात सहभागी होणार्‍या शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही टप्यात बोर्ड परीक्षेला बसण्याचा पर्याय मिळेल. अंतर्गत मूल्यांकन शैक्षणिक सत्रादरम्यान, केवळ एकदाच केले जाईल. यानुसार सबीएसईने फेब्रूवारीमध्ये मसुदा नियमांची घोषणा केली होती.


नंतर ते भागधारकांच्या अभिप्रायासाठी सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवण्यात आले होते. हा निर्णय नवीन शिक्षण धोरणाच्या शिफारशींनुसार आहे. ज्यानुसार बोर्ड परीक्षांमधील ‘ उच्च-स्तरीय’ पैलू दूर करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना कोणत्याही शैक्षणिक वर्षात दोन वेळा परीक्षा देण्याची परवानगी असेल असेही नियंत्रक संयम भारद्वाज यांनी नमुद केले आहे.

Comments


bottom of page