top of page

दीडकोटी घेवून कीर्तनकाराचे पलायन?, रिव्हाल्व्हरची चर्चा

लातूर: लातूर जिल्ह्यातील खंडापूर इथं जगद्गुरु तुकोबाराय यांचा 375 व्या वैकुंठगमन साहेळ्याचं औचित्य साधून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं. यात कीर्तनकार किशोर शिवणीकर महराराज यानपं सप्ताहातील सुमारे दीड कोटी रुपययांसह पलायन केल्याचं समोर आल्यानंद वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे.


संबंधित कीर्तनकाराकडे एक रिव्हॉल्व्हर असल्याचे देखील सांगितलं जात आहे. या प्रकाराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. शिवणीकर महाराज अद्याप समोर आलेला नसून, कायदेशीर कारवाईची मागणी केली जात आहे.


याची दखल घेत, छोटे माऊली म्हणून ओळतात, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन लातूर येथील शिवणीकर महाराजांनी धोका दिल्याचा आरोप केला आहे. शिवणीकर महाराज या आरोपांवर काय बोलतात, याकडे लक्ष लागलं आहे. छोटी माऊली यांच्या नेतृत्वात यापूर्वी सप्ताह झाले असून, ते अत्यंत भव्य-दिव्य स्वरुपाचे होते.


विंचूर जवळील भरवस फाट्याजवळ मागील काही महिन्यांपूर्वी, असाच भव्य-दिव्य स्वरुपाचा सप्ताह आयोजीत करण्यात आला होता. मात्र तो देखील वादग्रस्त ठरला. या सप्ताहाचे नेतृत्व स्व:त छोटे माऊली यांनी केलं. वारकर्‍यांच्या विश्वासाचा आणि श्रद्धेचा गैरफायदा घेऊन एवढ्या मोठ्या प्रकाणात माया जमवणारा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करणे, म्हणजे संतांच्या विचाराला हरताळ फासण्यासारखे असल्याची टीका होऊ लागली आहे.


दरम्यान, या आयोजकांवर कायदेशीर कारवाई करून, त्यांना अटक करण्याची मागणी त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानचे विश्वस्त डॉ. अमर ठोंबरे यांनी केली आहे. छोटे माऊली जो हिशोब देत आहेत, त्यापेक्षा प्रत्यक्ष खर्च मात्र जास्त दाखवला गेला आहे. शिवणीकर महाराज जो पैसे घेऊन पळालेला आहे, त्यापेक्षा आणखी काही वेगळे आहे, असा संशयही डॉ. अमर ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे.


राज्यातील शेतकरी आत्महत्या करतो आहे अन् दुसरीकडे कोट्यावधी रुपयांचे सप्ताह आयोजित केले जात आहे. हे सर्व विसंगत असून, असे कोट्यवधींचे सप्ताह बंद करून काही विधायक कामांसाठी उपाय योजना कराव्यात असे डॉ. अमर ठोंबरे यांनी सुनावलं आहे.


भक्ती-भावापोटी अनेक वारकरी, काही सामान्य लोक पैसे देतात, त्यामागे संतांची पुण्याई आहे, संतांवरील श्रद्धा आहे मात्र वारकरी संप्रदायाचे स्वत:धुरीण समाजतात, ते कुठेतरी या लोकांची फसवणूक करून कोट्यवधींची माया जमवत आहे, या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही डॉ. अमर ठोंबरे यांनी केली आहे.

Comments


bottom of page