top of page

दुर्गराज रायगडावर सापडले खगोलशास्त्र उपकरण




रायगडावर भारतीय पुरातत्व विभागाच्या उत्खननात एक खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे. ‘यंत्रराज’ हे प्राचीन खगोलाशास्त्रीय उपकरण आहे. ग्रह,तार्‍यांचा अभ्यास, दिशांचा वेध आणि वेळ मोजण्यासाठी याचा उपयोग होत असे. गेल्या 3 ते 4 वर्षापासून रायगडावर उत्खनन चालू आहे. कुशावर्त तलाव, वाडेश्वर मंदीर आणि बाजार पेठे ते जगदीश्वर मंदिर परिसरात 10ते 12 ठिकाणी हे काम पूर्ण झाले. कुशावर्त तलावाच्या वरच्या भागात आणि पर्जन्यमापक ते वाडेश्वर मंदिर परिसर उत्खनन दरम्यान हे सौम्ययंत्र सापडले आहे. शिवकालीन वाड्यांच्या अवशेषामधून हा ठेवा उजेडात आला आहे. यंत्रावर कासव, साप सदृष्य प्राण्यांचे अंकन आहे. मुख आणि पूछ अशी कोरिव अक्षरे उत्तर-दक्षिण दिशा दर्शवतात, हि रजचना खगोलशास्त्रीय गणकांसाठी उपयुक्त होती.


रायगडाच्या बांधकामात खगोलशास्त्रीय अभ्याचा उपयोग झाला. अक्षांस, रेखांक आणि कर्कवृृत्त याचा अभ्यास करून गडाची रचना अत्याधुनिक पद्धतीने झाली होती. या यंत्रामुळे शिवकालिन खगोलशास्त्र आणि स्थापत्यशास्त्राचा अभ्यास सखोल होणार आहे. इतिहास संशोधकांना यामुळे नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. छत्रपती शिवारायांच्या दुरदृष्टीचा आणखी एक पुरावा आहे. रागडावरील हा शेाध मराठ्याच्या वैज्ञाणीक प्रगतीचे दर्शन घडवत असल्याचे संभाजी राजे भोसले यांनी सोशल मिडियाच्या फेसबुक प्लॅटफॉर्मवर पोष्टद्वारे सांगितले आहे.

Kommentare


bottom of page