top of page

देवदर्शनासाठी गेलेल्या पवार कुटुंबीयांवनर काळाचा घाला




नांदेडच्या माहूर तालुक्यातील लोकरवाडी येथील पवार कुटुंबीय मध्यप्रदेश येथील उज्जैन शिउर येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपुन ते परतीच्या प्रवासाला असताना अकोला खामगांव दरम्यान यांच्या इरटीका गाडीस रात्रीला अंदोजे 1:00 च्या दरम्यान अपघात झाल्याची माहिती आहे. या भिषण अपघातात 3जणांचाा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


सिंदखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोकरवाडी येथील देवराव गंगाराम पवार सेवा निवृत्त शिक्षक त्यांची पत्नी बेबिताई देवराव पवार, मुलगा निकेतन देवराव पवार 2 मुली 1 नात व जावाई असा परीवार मिळून मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते पतीच्या प्रवासात असताना त्यांच्या ईरटीका गाडीस खामगांव जवळ (13 मे) रात्री 1:00 च्या सुमारास भिषण अपघात झाला.


या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचुर झाला असून यात देवराव पवार, बेबीताई पवार, निकेतन पवार यांचा तिघांचा मृत्यू झाला असून यातील चालक संतोष कदम व इतर गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या भिषण अपघातात पवार कुटुंबाती दुर्दैवी मृत्यू झाल्याने तालुक्यात शोककळा पसरली आहे.


Comments


bottom of page