top of page

देशभरातील बाईक चालकांना टोल प्लाझाची कर सवलत कायम - केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी



चारचाकी वाहणांसाठी वार्षिक पासचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जाहिर केला आहे. यामुळे चारचाकी वाहनचालकांना टोल देयकापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हा निर्णय ताजा असतानाच आता दुचाकी वाहनांना राश्ट्रीय महामार्गाच्या टोलवर कर भरावा लागेल, असे वृत्त समोर आले होते. हा नियम 15 जूलैपासून लागू होईल, असेही सांगण्यात आले. मात्र, केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.


दुचाकी खरेदी करतानाच टोल कर वसुल केला जातो. असे असताना दुचाकी वाहने राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझामधून जातात तेव्हा त्यांच्याकडून टोल कर आकारला जात नाही. राष्ट्रीय महामार्गावरील चारचाकी किंवा त्यावरील वाहनांकडूनच टोल कर वसूल केला जातो. पण नवीन नियमानुसार दुचाकी वाहनांना फास्टटॅगद्वारे टोल भरावा लागेल. जो कोणी नियमाचे उल्लंघन करेल त्याला दोन हजार रुपये दंड भारावा लागेल, असे व्हायरल होणार्‍या वृत्तात म्हटले होत . एनएचएआय च्या टोल माहिती प्रणालीच्या नोंदीनुसार काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत देशात एकून 1057 एनएचएआय टोल आहेत. त्यापैकी सुमारे 78 टोल आंध्र प्रदेशातच आहेत. बिहारमध्ये राष्ट्रीय महामार्गावर 33 टोल आहेत तर उत्तर प्रदेशात 123 टोल प्लाझा आहेत. दरम्यान, नितिन गडकरींनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.


केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी एक्स पोस्टद्वारे माहिती दिली की, टू व्हिलर चालकांकडून कोणत्याही प्रकारे टोल घेतला जाणार नाही, काही मिडियाद्वारे टू व्हिलर चालकांना टोल प्लाझाचा कर भरावा लागणार असल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, असा कुठलाही निर्णय प्रस्तावीत नाही. दोन चाकी वाहनांना पूर्णपणे टोलवर सुट दिलेली आहे. सत्यता न पाहता खोट्या बातम्या पसरवून खळबळ निर्माण करणे स्वस्थ पत्रकारीतेचे लक्षण नाही अशा खोट्या बातम्यांची मी निंदा करतो. असेही मंत्री गडकरी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये नमुद केले आहे.

Kommentare


bottom of page