देशातील आणखी एक बँक बंद! आरबीआयने लावले टाळे
- Navnath Yewale
- Apr 17
- 1 min read

रिझर्व बँक ऑफ इंडिया ने अहमदाबाद (गुजरात) येथील कलर मर्चंट्स को- ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. आरबीआयने बँकेची कमकुवत आर्थिक स्थिती आणि भविष्यात कमाईच्या संधीचा अभाव, हे या निर्णयाचे कारण असल्याचे सांगितले आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नाही किंवा भविष्यात नफा मिळवू शकेल, असे व्यवसाय मॉडेल नाही.
याशिवाय, बँक बँकिंग नियमन कायद्याचे काही नियम पाळू शकली नाही रिझर्व्ह बँकेने गुजरातच्या सहकारी संस्थांच्या रजिस्ट्रारला बँक बंद करण्याचा आणि त्यासाठी लिक्विडेटर नियुक्त करण्याचा आदेश जारी करण्याची शिफारस केली आहे. सध्याच्या परिस्थितीत बँक चालवणे, सुरू ठेवणे ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक ठरेल, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.
98.51 टक्के खातेदारांना पूर्ण रक्कम मिळणार
परवाना रद्द झाल्यानंतर, कलर मर्चंट्स बँक यापुढे कोणतेही बँकिंग व्यवहार करू शकणार नाही. याचा अर्थ बँक पैसे जमा करू शकणार नाही आणि परतही करू शकणार नाही. तथापी ठेवीदारांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अंतर्गत प्रत्येक खातेधारकाला पाच लाचापर्यंतची कमाल विमा रक्कम मिळेल.
बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, सुमारे 98.51 टक्के ठेवीदारांना त्यांचे संपूर्ण पैसे डीआयसीजीसीकडून परत मिळतील. 31 मार्च 2024 पर्यंत डीआयसीजीसी ने पात्र ठेवीदारांना विमा दाव्याच्या स्वरुपात 13.94 कोटींची रक्कम आधीच जारी केली आहे. या हालचालीवरुन असे दिसून येते की, बँक अपयशी ठरली तरी, ठेवीदारांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी यंत्रणा आधीच अस्तित्वात आहेत.
Comentarios