top of page

देशात सक्रिय रुग्णांची संख्या 6, 836 पार; 24 तासांत 428 नवीन रुग्णांची नोद 2 मृत्यू


भारतात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत आहे. मंगळवारी सक्रिय रुग्णांची संख्या 6,836 वर आली. जी सेामवारी 7264 होती. भारतात कोविड-19 च्या नवीन प्रकारांच्या रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे दिलासादायक बातमी आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सलग तिसर्‍या दिवशी कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 428 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या 6,836 पर्यंत कमी झाली आहे. या काळात 2 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.


सोमवारी(16 जून) 119 रुग्णांची घट झाल्यानंतर आज मंगळवारी केरळमध्ये सर्वाधिक 261 रुग्णांची घट झाली. गुजरातमध्ये 185, दिल्लीत 94, महाराष्ट्रात 28, आंध्रप्रदेशात 18, सिक्कीममध्ये 13, आसाममध्ये 3 आणि तेलंगणा, बिहार, छत्तीसगड आणि गोव्यात प्रत्येक 1 रुग्ण आढळला आहे.


1 जानेवारी ते 17 जून दरम्यान कोरोनामुळे 109 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये केरळ आघाडीवर आहे. आतापर्यंत येथे कोरोनामुळे 35 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, महारष्ट्रात 29 मृत्यूंसह दुसर्‍या स्थानावर आहे. दिल्ली 12 मृत्यूंसह तिसर्‍या स्थानावर आहे. कर्नाटक 11 मृत्यूंसह चौथ्या स्थानावर आहे.

Comments


bottom of page