top of page

धक्कदायक : वाल्मिक कराडने माझ्यासमोर...

बाळा बांगरचे पत्रकार परिषदेतून धक्कादायक खुलासे



संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्ये प्रकरणी कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडची दहशत आणखी आहे. वाल्मिक कराडने माझ्यासमोर तीन लोकांना मारलं, वाल्मिक कराडला धनंजय मुंडेचे पीए असलेल्या प्रशांत जोशीलाही मारायचं होतं. महादवे मुंडेचा खुन केल्या नंतर त्याच्या मानेचं मांस टेबलावर ठेवायला लावलं. माझ्या आईचाही आंबाजोईला नेऊन घात करायचा होता. वाल्मिक कराड विषयी असे अनेक खुलासे बाळा बांगर यांनी आज बीड येथे पत्रकार परिषदेत केल्याने एकच खळबळ उडाली आहे.


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्ये प्रकरणी खंडणी व इतर गुन्ह्यात बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराड विषयी युवा नेते बाळा बांगर यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे केले आहेत. बाळा बांगर यांनी आज बीड येथे आयोजीत पत्रकार परिषदेत काही पुरव्यासह दावे केल्याने एकख खळबळ उडाली आहे.

बाळा बांगर म्हणाले की, माझ्याकडील पुरावे मी परराज्यात ठेवले होते त्यामुळे मी अत्तापर्यंत गप्प होतो. आता पुरावे हाती आले आहेत, शिवाय आणखी काही पुरावे विदेशात ठेवले आहेत. वाल्मिक कराड आणि माझ्यात विचाराची दुश्मणी आहे. आमच्यात 2023/24 मध्ये मन-मत भेद झाले. आडिच वर्षे आम्ही सोबत होतो. बीड जिल्हा वाल्मिक कराड सारख्या समाज कंटकामुळे जातीय तेढ निर्माण झाली. आलिकडेच बीड शहरात अल्पवयीन मुलीच्या लैगिंक छळाची घटना समोर आली आहे, त्यातील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी या मताचा मी आहे. सन 2023/24 पासून वाल्मिक कराडने लोकांवर गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. यातच माझे आणि वाल्मिकचे मन-मतभेद निर्माण झाले. मी सांगत होतो लोकांवर गुन्हे दाखल करू नका, अशा कित्तेक लोकांसाठी मी वाल्मिक सोबत भांडलो त्यांच्यासाठी पुढे आलो. या शिवाय कित्तेक लोकांचा मी जीव वाचवला. वाल्मिक मागे अदृश्यशक्ती तर होतीच पण त्याच्या मागे पोलीस यंत्रणेतील काही अधिकारी, कर्मचारही जे त्याचे लाभार्थी होते.



माझ्या कुटुंबावर दबाव टाकण्याचा खूप प्रयत्न त्याने केला. दबाव येत नसल्यामुळे आमचा छळ केला. माझ्या आईवर खोटा 307 चा गुन्हा दाखल केला. मध्यरात्री पोलीसांनी माझ्या आईला सोबत महिला कर्मचारी नसताना घरून अटक केली. त्यावेळी सीए थोरात नसते तर अंबाजोगाईला नेऊन माझ्या आईचे बरेवाईट करायचे होते. माझी आई, मी, माझे वडीला यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लावले.


मी मुंबईला गेलो तेव्हा एक बिगर लग्नाची महिला हॉटेल मध्ये होती. तो म्हणला या युवराज मी नाही बोलणार ही भगीणीच बोलेल आधी गळ्यात हात टाकून बसला होता. त्यानंतर ती महिला मला म्हणाली. की तु वाल्मिक आंण्णासोबत जुळून घे, दुसर तुझ्या संगळ्या संस्था दे, तीसरं तुझ्यावर रेप केस मी दाखल करेल अन्यथा तु स्वत:ला गोळी घालून घे मला एक रिव्हॉलव्हर दिली होती त्यावर मी त्यांना लगेच सांगितलं होत की मी या पैकी काहीही करणार नाही.


वाल्मिकने ज्या कुटुंबांना छळलं ते मी सर्व सांगणार आहे. त्याला जिल्ह्याचा गॉडफादर, मराठवाडा ताब्यात घ्यायचा होता, आणि पुढे मंत्रीही त्याला व्हायचं होतं. माझ काय चुकलं पिडीत कुटुंबांच्या बाजूने उभा राहिलो. वाल्मिक कराड हा जातीय वादी आहे, त्याने एका बौद्ध कुटुंबाला छळलं त्याची ऑडिओ क्लिपच ऐका. माझ्यासमोर वाल्मिकने तीन लोकांना मारलं आहे.


महादेव मुंडे प्रकरण सर्व माहित आहे. वाल्मिकच्या लोकांनी महादेव मुंडेचा खून केला एवढच नाही तर त्याच्या मानेचं मांस वाल्मिक कराडने टेबलवर ठेवलं होतं. संतोष देशमुख यांच्या हत्तेत सहभाग नाही असं म्हणता तर, मी त्यावेळी नुकताच विदेशातून दिल्ली येथील बसस्टँड वर आलो होतो. त्यावेळी एक महाराष्ट्रीयन आणि एक परप्रांतीय सायंकाळी साधारण 5:30 च्या सुमारास माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले काही नाही तुला एकाजणाशी फोनवर बोलायचं आहे. मी ओळखलं आणि त्यांनी वाल्मिक कराडला फोन लावून दिला. त्यावेळी वाल्मिक कराड मला म्हणाला की, “ काय युवराज काय चाललंय, तुमची सरपंच संघटना संपली आजच सायंकाळी तुमच्यातल्या एका सरपंचाचा मर्डर होणार आहे. एका सरपंचाचा मर्डर आणि दुसरा (मी) जेल मध्ये संपली तुमची सरपंच संघटना.” आणि त्याच्या काही तासांनंतर म्हणजे सायंकाळी 6:30 च्या नंतर संतोष देशमुख यांची बॉडी सापडली.


मला त्याची प्रॉपर्टी कुठंय त्याला किती बायका आहेत, त्याच्या कोणत्या मेव्हण्याच्या नावावर काय आहे हे सगळं माहिती आहे. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना प्रशांत जोशी (त्यांचे पीए) फोटो काढण्यात व्यस्त होते. तेवढ्यात वाल्मिकने जोशी यांना फोन केले पण व्यस्त असलेल्या जोशींनी प्रतिसाद दिला नाही म्हणून वाल्मिकला जोशींना संपवायचं होतं. ही वाल्मिकची विकृती आहे असाही धक्कादायक खुलासा बाळा बांगर यांनी पत्रकार परिषदेत केला.


याशिवाय मला आत्महत्येस वारंवार प्रवृत्त करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. मी त्याच्या विचारांपासून विभक्त झालो म्हणून त्याने आमच्या ट्रस्टीच्या शाळांवर (संस्थांवर) डोळा ठेवला. आणि त्यातुनच त्याने आमच्यावर खोट्या केसेस दाखल केल्याचा दावाही बाळा बांगर यांनी केला. दरम्यान, बाळा बांगर यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यांमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Komentáře


bottom of page