top of page

धक्कादायक! बंगळुरुच्या महादेवपूमधील 80 मतदार अयलेली ‘ती’ खोली भाजप कार्यकर्त्याच्या नावावर?

ree

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेत लोकसभेसह विविध विधानसभांमध्ये मतांची चोरी झाल्याचा पुराव्यानिशी आरोप केला होता. त्यांनी केलेल्या या खळबळजनक आरोपांनंतर निवडणुक आयोगानं त्यांना प्रतिज्ञापत्रावर या बाबी खर्‍या अहेत हे सांगावं, असे निर्देश दिले.


पण आता निवडणुक आयोग खरोखरचं संशयाच्या भोवर्‍यात येतोय की काय अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. कारण राहु गांधींनी काल केलेल्या आरोपानुसार एकाच वन रूम किचनच्या घरात 80 मतदार असल्याचा दावा केला होता, हा दावा खरा ठरला आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनं राहुल गांधींच्या या पत्राकर परिषदेनंतर त्या घराला भेट दिली. यावेळी पडताळणीत ही खोली एका भाजपच्या कार्यकर्त्याच्या नावावर असल्याचं उघड झालं आहे.


बंगळुरुच्या महादेवपूर विधानसभा मतदारसंघातलं हे प्रकरण आहे. या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला तब्बल सव्वा लाख मतांचं लीड मिळालं होतं. हा विधानसभा मतदारसंघ बंगळुरु मध्ये लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघासह इतर चार मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला काँग्रेसपेक्षा कमी लीड होतं. पण केवळ या एकमेव पाचव्या मतदारसंघात मोठी लीड मिळाल्यानं भाजपचा खासदार निवडून आला होता. त्यामुळं या महादेवपूर मतदारसंघात भाजपनं निवडणुक आयोगाच्या मदतीनं मतांची चोरी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.


पडताळणीत नेमकं काय?

दरम्यान, राहुल गांधींच्या आरोपांनुसार,बंगळूरु शेहरातील महादेवपूर विधानसभा मतदारसंघात ज्या 80 मतदारांचा पत्ता एकच दाखवला आहे. त्या मून रेड्डी गार्ड भागातील चाळवजा घराला इंडिया टुडेच्या रिपोर्टरनं भेट दिली. यावेळी त्या घरात राहत असलेल्या डिलिव्हरी बॉय असलेल्या व्यक्तीसोबत त्यानं संवाद साधला. या व्यक्तीला त्यानं काही प्रश्न विचारले. त्यावर आपण एक महिन्यापूर्वीच इथं रहायला आले असल्याचं त्यानं सांगितलं. तसंच ही खोली कोणाच्या नावावर आहे? असं विचारल्यानंतर जयराम रेड्डी नामक व्यक्तीचं नाव घेतलं. त्यानंतर हा घरमालक कोण आहे? कुठल्या पक्षाचा आहे? हे रिपोर्टरनं विचारलं तर रहिवाशानं आपल्याला हे महिती नसल्याचं म्हटलं. या चर्चेचा व्हिडिओही चॅनेलनं शूट केलेला आहे. त्यानंतर रिपोर्टरनं थेट घरमालक जयराम रेड्डींचा फोन घेतला. यावेळी या रेड्डी नामकं व्यक्तीनं आपण भाजपचा कार्यकर्ता असल्याचं सुरुवातीला मान्य केलं, पण नंतर त्यानं घुमजावं केलं.


पुढे रेड्डी यांनी सांगितलं की, गेल्या दहा वर्षांपासून मी ही खोली भाड्यानं देत आहे. त्यामुळं त्याठिकाणी जे राहिलेत त्यांनी आपलं नाव निवडणुक यांदी नोंदवत असेल पण ते फार काळ इथं राहत नाहीत काही काळानंतर निघून जातात. त्यावर रिपोर्टरनं त्याला विचारलं की, मग याबाबत इथल्या मतदारांबाबत तुम्ही निवडणूक आयोगाला काही माहिती का दिली नाही? कारण तुमच्या खोलीच्या पत्त्यावर 80 मतदारांची नोंदणी झालेली आहे. यावर उत्तर देताना त्यांनं सांगितलं की , यातील अनेकजण परत आपल्या गावी गेले आहेत, अनेकजण परत आलेलेच नाहीत. तर काहीजण पुन्हा मतदारासाठी येतात. काहींची मतदानही रद्द झालेलं आहे.

Comments


bottom of page