धनंजय मुंडेंना बीड प्रकरणात एसआयटी मागणीचा अधिकार नाही - अंजली दमानिया
- Navnath Yewale
- 7 days ago
- 2 min read

बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैगिंक छळा प्रकरणी आमदार धनंजय मुंडे आक्रमक झाल्याचे दिसून आले. आरोपींच्या कठोर शिक्षेसाठी आमदार मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याकडे एसआयटीची मागणी केली. आरोपी आमदार संदीप क्षिरसागर यांचे समर्थक असल्याचा दावा करत आमदार मुंडे यांनी आमदार क्षिरसागरांना लक्ष केले. यावर आता अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत, धनंजय मुंडे यांच्यावरच आरोप असल्याने त्यांना एसआयटी मागणीचा अधिकार नसल्याचे म्हणत अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला.
बीड येथील उमाकिरण या खासगी कोचिंग क्लासेसचा चालक विजय पवार, शिक्षक प्रशांत खटावकर यांना पोलीसांनी मांजरसुंबा येथून आटक केली. दरम्यान, खासगी कोचींग क्लासचा चालक विजय पवार हा संदीप क्षिरसागर यांचा समर्थक आहे. घटना घडली त्यावेळी आरोपी कुठे होते? आरोपींना कोणी मतद केली? आरोपींसह आमदार संदीप क्षिरसागर यांचे सीडीआर आणि डिपीआर काढण्याची मागणी पोलीस अधिक्षक नवनित कॉवत यांच्याकडे आमदार मुंडे यांनी केली. दरम्यान, बीड येथे दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेतून आमदार धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षिरसागर यांच्यावर आरोप करत प्रकरणाच्या तपासासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे महिला आयपीएस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी ची मागणी करणार असल्याचेही आमदार मुंडे म्हणाले होते.
त्यानुसार (1 जूलै) रोजी आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांची भेट घेवून निवेदनाद्वारे एसआयटीची मागणी केली.
दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या लैगिंक छळ प्रकरणातील आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपासाच्या सर्व यंत्रणांचा अवलंब करण्यावर आमची काहीच हरकत असण्याचा संबंध नाही. या प्रकरणात गुन्हा दाखल होवण्यास दहा दिवसाचा कालावधी लागला नाही, आरोपीचे माझ्यासोबत फोटो असले, तरी मी सहा महिने अज्ञात वासात गेलो नाही, असे उपरोधक प्रश्न उपस्थित करत आमदार संदीप क्षिरसागर यांनी अप्रत्यक्षपणे आमदार मुंडे यांच्यावर निशाना साधला होता.
आमदार मुंडे यांच्या एसआयटी मागणी बाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संताप व्यक्त केला. दमानिया म्हणाल्या की, “ जो माणुस स्वत: महिलांना त्रास देतो, ज्याच्यावर महिला अत्याचाराच्या केसेस आहेत, त्याचे म्हणणे मुख्यमंत्री एका दिवसात ऐकून एका महिला आयपीएस ची एसआयटी लावतात? इतकी मित्रता? मुंडेंनी मागितली आणि एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी एसआयटी जाहीर केली? आज दुपारी 2:00 वाजता मी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे यांची भेट घेणार आहे. काल धनंजय मुंडे बीड च्या अल्पयीन मुलीवर भाष्य करताना बघून खूप राग आला. जो माणूस स्वत: महिलांना त्रास देतो, ज्याच्यावर महिला अत्याचाराच्या केसेस आहेत, त्याचे म्हणणे मुख्यमंत्री एका दिवसात ऐकून महिला आयीपीएस ची एसआयटी लावतात?
बीडच्या त्या अल्पवयीन मुलीला तातडीने न्याय मिळालाच पाहिजे, पण त्यासाठी लढायला चांगली सुसंस्कृत माणसं आहेत, आम्ही नेहमी प्रमाणे लढूच. यावर बोलण्याचा हक्क धनंजय मुंडेना नक्कीच नाही. वैष्णवीच्या केस मधे मी तिच्या आईवडिलांना वर्षा बंगल्यावर घेऊन गेले तेव्हा एक महिन्याने फास्ट ट्रॅक वर केस घेतली. ही केस मुख्यमंत्र्यांनी का तत्काळ फास्ट ट्रॅकवर घेतली नाही? सगळ्या महिला आमदारांनी ह्याचा विरोध करायला हवा. महिलांच्या सगळ्या प्रश्नांची दखल ही तत्काळ घेतली गेली पाहिजे, पण ती मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून घ्यावी. धनंजय मुंडेंना यावर बोलण्याचा हक्क नसल्याचे म्हणत त्यांनी माध्यमांसमोर संताप व्यक्त केला.
Comments