top of page

धनंजय मुंडेच्या कार्यकर्त्यांकडून फसविण्याचा प्रयत्न !सतिष(खोक्या)भोसलेच्या कुटूंबीयांनी घेतली अजित दादाची भेट


धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून सतिष (खोक्या) याच्या आमच्या कुटुंबाला फसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वन विभागाने खोटे गुन्हे दाखल केले असून सुडाच्याा खोक्यावर सुडाचं राजकारण केलं जात असल्याचा अरोप करत सतिष (खोक्या) भोसले यांच्या कुटूंबीयांनी मंगळवारी (दि.8) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.


बीडमधील सतिष (खोक्या) भोसले यांच्या इंन्स्टावरील पैंसे उधळण्याचा रिल्स, बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीस बॅटने मारहाण, बावी (शिरुर कासार) येथील ढाकणे कुटुंबीयांना मारहाण प्रकरणी खोक्यावर विविध कलामांतर्गत शिरुर (का.), चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणार्‍या आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून परिचीत आहे.


दरम्यान, हरणाची शिकार करताना आडवं आल्याने खोक्या भोसले व त्याच्या साथीदारांनी जबर मारहाण केल्याचा आरोप ढाकणे कुटुंबीयांनी केला तर रानडुककर धरण्यासाठी शेतात बोलावून मुलास मारहाण व मुलीचा विनभंग केल्याचा आरोप खोक्या भोसलेच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला. शिरुर पोलिसात तसे परस्पर विरोधात गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, शिकारीचा मुद्यावरुन खोक्या भोसले यानी मारहाण केल्याप्रकरणी वन विभागाने खोक्या भोसले याचे राखीव वनक्षेत्रातील घरावर बुलडोझर फिरवले.


तत्पुर्वी खोक्या भोसलेच्या घरातील साहित्याची तपासणी करण्यात आली यामध्ये शिकारीसाठी लागणारे साहित्यासह इतर संशयास्पद वस्तु अढळून आल्याचा पंचनामा वनविभागाकडून करण्यात आला. खोक्या भोसले हा आमदार धस याचा कार्यकर्ता असल्याने खोक्याने जवळपास दोनशे हरणांची शिकार केली, त्याच्यासह आमदार धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ढाकणे कुंटुंबासह इतर कार्यकर्त्यांकडून शिरुर बंद ठेवून मोर्चा काढण्यात आला होता.


खोक्या भोसले प्रकरणात आमदार धस यांना सहआरोपी करण्याच्या मागणीसाठी आझाद मैंदानावर आंदोलन करण्यात आले. विविध गुन्ह्या प्रकरणी खोक्या भोसले सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहे. जामिनसाठी प्रयत्नरत असलेल्या खोक्या भोसलेच्या कुटुंबीयांनी मंगळवारी (दि.8) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. मंत्रालय परिसरात खोक्या भोसले याच्या कुटुंबीयांनी माध्यमांशी संवाद साधत आमदार धनंजय मुंडे यांच्या कार्यर्त्यांवर आरोप केले. खोक्या भोसलेवर सर्व खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



खोक्या भोसलेवर सुडाचे राजकारण केले जात असल्याच आरोप करत विभागिय वन अधिकारी आमोल गरकळ यांनाही आमदार धनंजय मुंडे यांच्या मर्जीत काम करण्याचा आरोप करण्यात आला. या शिवाय आमदार धनंजय मुंडे यांच्या शिरुर कासार तालुक्यातील कार्यकर्त्यांचा उल्लेख करत खोटे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडून आमच्यावर अन्याय करत असल्याचा आरोपही कुटूंबीयांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबीयांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारत बीड जिल्हाधिकार्‍यांना योग्य चौंकशी करुन अन्याय झाला असेल तर कारवईच्या सुचना देण्याचे अश्वासन दिले.

Comments


bottom of page