धनंजय मुंडे आणि त्यांचा गटच वाल्मिक कराडला संपवू शकतो!
- Navnath Yewale
- Apr 14
- 2 min read

निलंबीत पोलिस अधिकारी रंजीत कासले यांनी एक गंभीर दावा केला आहे की, वाल्मीक कराडचा एनकाऊंटर करण्याची मला ऑफर होती. त्यासाठी मला पाच ते पन्नास कोटी देण्यात येणार होते. त्यावर सामाजी कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीदेखील तसाच गंभीर दावा केला आहे.
धनंजय मुंडे अन गटच वाल्मिक कराडला सांपवणार
वाल्मिक कराडचा एनकाऊंटर होणार आहे का? माहिती नाही पण मागच्या वेळेस सांगितलं होतं त्याचा खून होऊ शकतो. त्याला स्लिप एपीनियन नावाचा आजार आहे. यामध्ये झोपता झोपता श्वास बंद पडतो, त्यामुळे त्याला मारालं जाऊ शकतो. किंवा तो कोठडीमध्ये मृत अवस्थेत सापडला जाऊ शकतो असं घोषीत केले जाऊ शकतं, कारण या प्रकरणामध्ये तो प्रमुख आहे.
त्यामुळे राजकीयपदावर असणारे मोठे मोहरे अडचणीत आले आहेत. म्हणून त्याला संपवले जाऊ शकते. त्यामुळे रंजीत कासले यांनी केलेल्या दाव्याची चौकशी केली जावी. जेणेकरुन त्यांना सुपारी कोणी दिली होती, का दिली होती हे समोर येईल. तर धनंजय मुंडे यांचे देशमुख हत्या प्रकरणामध्ये मंत्रीपद गेले त्यानंतर करुणा शर्माच्या प्रकरणामध्ये त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. त्यामुळे राजकारणात वगैरे गोष्टी स्वत: वाचवण्यासाठी लांब केल्या जाऊ शकतात. त्यामुळे धनंजय मुंडे किंवा त्यांचा गटच वाल्मिक कराडला संपवणार असा दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे.
संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या एनकाऊंटरची ऑफर होती. असा दावा निलंबीत पोलिस अधिकारी रनजीत कासले यांनी केला आहे. यावेळी कासले यांनी एनकाऊंटर कसा केला जाऊ शकतो याचीही माहिती दिली आहे. कासले यांनी त्यांच्या सोशल मिडियाच्या माध्यमातून हे दावे केले आहेत.
मी अक्षय शिंदे यांच्या एनकाऊंटरची बातमी पाहिली या पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि एसआटी बसवा असं कोर्टाने म्हटलं. एसआयटी बसवूनही काही उपायोग होणार नाही, जर चौकशी करायची असेल तर केंद्राची यंत्रणा बसवा मग त्यातून सत्य बाहेर येईल. फेक एनकाऊंटर कसे होतात हे मी सांगतो. ज्यावेळी मला वाल्मिक कराडच्या एनकाऊंटरची ऑफर दिली होती. पण मी नकार दिला एनकाऊंटरसाठी मोठी रक्कम ऑफर दिली जाते.
10 ते 50 कोटी रुपये इतके दिले जातात. तुम्ही बोलाल तेवढे पैसे देतात. मी सायबर शाखेत होतो, पण मी हे करू शकतो ही माहिती असल्याने त्यांनी मला ही ऑफर दिली होती असं कासले यांनी सांगितलं आहे.
Komentáře