top of page

धनंजय मुंडे यांच्या आमदारकी विरोधात न्यायालयात धाव!

एकट्या कासलेला दहा लाख तर इतरांना किती रुपये वाटले, म्हणत चौकशीसाठी राजेसाहेब देशमुख सरसावले



बीड राज्याच्या राजकारणात गेल्या चार महिण्यांपासून बीड जिल्हा केंद्रस्थानी आहे. अगोदर विधानसभा निवडणूकांमध्ये आमदार धनंजय मुंडेच्या निकटवर्तीयांकडून झालेल्या गुंडगिरीमुळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीने गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन राज्यात तिव्र संतापाची लाट उसळल्यानंतर धनंजय मुंडेना मंत्रीपदाचा राजीनामा देणं भाग पडलं.


आता बीडमधील निलंबीत पोलिस निरिक्षक रंजित कासले यांनी धनंजय मुंडेवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच त्यांच्या माणसांकडून माझ्या बँक अकाऊंडवर दहा लाख रुपये टाकण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावरुन आत परळी मतदारसंघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विधानसभा उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी न्यायालयात धाव घेणार असल्याचे म्हटल्याने खळबळ उडाली आहे.


एकट्या रंजित कासलेला दहा लाख दिले असतील, तर बाकीच्यांना किती दिले, असा सवालही देशमुख यांनी केला आहे. रंजित कासले यांना धनंजय मुंडे यांनी ईव्हिएम पासून दूर जाण्यासाठी दहा लाख रुपये दिल्याचे कासले यांनी म्हटले आहे. त्यावर परळी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी परळी मतदारसंघात कशा पद्धतीने प्रशासनाचा गैरवापर झाला याची स्पष्टता दिली आहे.


आता या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयात धाव घेणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. परळी मतदारसंघात विधानसभा निवडणूकी निमित्त धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख एकमेकां विरोधात उभे ठाकले होते.मात्र या निवडणूकीत शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. आता कासले यांच्या आरोपा नंतर देशमुख पुढे आले असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी ते न्यायालयात धाव घेणार आहेत. तर यापूर्वीच सामाजीक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या निवडीविरुद्ध न्यायालयात दाद मागितली आहे.


विधानसभा निवडणूकांवेळी परळी मतदार संघात ईव्हिएम सोबत छेडछाड करण्यात आली. त्यासाठी मला बाजूला करण्यात आलं आणि नंतर अकाऊंटवर दहा लाख रुपये देण्यात आल्याचं निलंबीत पोलिस उपनिरिक्षक रंजित कासले म्हणाले. तसेच वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी धनंजय मुंडे यांची ऑफर होती असा दावाही त्यांनी पुन्हा एकदा केला.


रंजित कासले हे पुणे विमानतळावर आल्यानंतर त्यांना बीडच्या पोलिसांनी स्वारगेट येथे एका हॉटेलमधून अटक केली. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांसी संवाद साधला त्यामध्ये धनंजय मुंडे पासून मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत आणि बीड पोलिसांपासून ते आयएएस-आयपीएस अधिकार्‍यांपर्यंत रजित कासले यांनी गंभीर आरोप केले आहेत.


Commenti


bottom of page