धनंजय मुंडे व करुणा मुंडे यांचे संबंध लग्नासारखेच, डीएमला न्यायालयाचा झटका
- Navnath Yewale
- Apr 10
- 2 min read

वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने काही दिवसापूर्वी करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा निकाला देताना दर महिण्याला दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते. वांद्रे दंंडाधिकारी न्यायालयाच्या या निकालाविरोधात धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात धाव घेतली होती. या खटल्यावर दि.5 एप्रील रोजी सुनावणी झाली, तेव्हा माझगाव सत्र न्यायालयाने वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.
या नंतर माझगाव सत्र न्यायालयाचा सविस्तर आदेश समोर आला आहे. त्यानुसार धनंजय मुंडे यांना पुन्हा झटका बसला आहे. धनंजय मुंडे यांचे करुणा शर्मांसोबतचे संबंध विवाहाच्या स्वरुपाचे असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत त्या दिलास मिळण्यास पात्र असल्योच न्यायालयाने म्हटले आहे.
वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने दि.4 फेब्रूवारी रोजी करुणा शर्मा यांची याचिका मान्य केली होती. कार्टाने धनंजय मुंडे यांना दरमहा 1,25000 रुपये आणि करुणा शर्मा (मुंडे) यांच्या मुलीला 75000 रुपये देण्याचे आदेश दिले होते. मात्र सुनावणीवेळी धनंजय मुंडे यांनी मुलांचा सांभाळ करण्याची तयारी दर्शवली होती. तर करुणा मुंडे यांना पत्नी मानण्यास नकार दिला होता.
यानंतर माझगाव सत्र न्यायालयात झालेल्या पहिल्या सुनावणीवेळी धनंजय मुंडे यांच्या वकिलाने करुणा मुंडे यांना पोटगी मिळू नये, म्हणून दोघांचे अधिकृत लग्न न झाल्याचा दावा केला होता. मात्र करुणा मुंडे यांच्या वकिलाने लग्नाचे पुरावे असल्याचे म्हटले. याप्रकरणीदि.5 एप्रील रोजी सुनावणी झाली. तेव्हा करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची मीच पहिली पत्नी असल्याचा पुरावा म्हणून धनंजय मुंडे याचे अंतिम इच्छापत्र आणि स्वीकृती पत्र दिले होते.
स्वीकृती पत्रात माण्या घरच्यांच्या दबावापोटी मी लग्न करत आहे. पण करुणा मुंडे यांचा मी सांभाभ करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. हे पुरावे तपासल्यावर माझगाव सत्र न्यायालयाने वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने निर्णय कायम ठेवला होता. यानंतर बुधवारी (दि.9) एप्रील न्यायालयाचा सविस्तर आदेश समोर आला.
न्यायालयाने म्हटले की, धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील संबध लग्नासारखे आहेत. कारण त्यांनी दोन मुलांना जन्म दिला आहे. आणि एकाच घरात राहिल्याशिवाय हे शक्य नाही. तसेच एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैंली लक्षात घेवून, करुणा शर्मा यांना अंतरिम देखभालीचा आदेश देणे योग्य आहे.करुणा मुंडे आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैंली मिळायला हवी.
याशिवाय घरगुती हिंसाचाराची बळी पडलेली आणि लग्नासारख्या लिव्ह-इन- रिेलेशनशिपमध्ये राहिलेली महिला घरगुती हिंसाचार कायाद्याअंतर्गत दिलासा मिळण्यास पात्र आहे. असे न्यायालयाचे स्पष्ट करत धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळली आहे.
Commenti