top of page

धनगर आरक्षण आंदोलक दिपक बोर्‍हाडे यांच्या सासर्‍याची आत्महत्या


जालना: मुंबईमध्ये अझाद मैदानात धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसलेल्या दिपक बोर्‍हाडे यांच्या सासर्‍याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव रामराव होळकर असे आहे. त्यांनी आत्महत्या का केली? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, पण उपोषणाला बसेलेल्या जावयाची प्रकृती खालावल्याने होळकर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.


मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये धनगर समाजाकउून आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. राज्यातील धनगर समाजाचे अनेक लोक मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये जालना जिल्ह्यातील दिपक बोर्‍हाडे यांचाही समावेश आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाासाठी दिप बोर्‍हाडे लढा देत आहेत. इतर कार्यकर्त्यांसोबत तेही काही दिवसांपूर्वी मुंबईत आरक्षणाच्या लढ्यासाठी दाखल झाले होते. पण काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत आहे, त्यातच आता त्यांच्या सासर्‍याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.


धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दिपक बोर्‍हाडे मुंबईत उपोषणाला बसले आहेत, तर दुसरीकउे जालन्यमध्ये बोर्‍हाडे यांचे सासरे रामराव होळकर यांनी आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, होळकर यांनी आज दुपारी जावाई दिपक बोर्‍हाउेयांच्या छत्रपती कॉलनीतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाताबात धनगर समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments


bottom of page