धाकट्या पंढरीत विठुरायाची जरांगे पाटलांच्या हस्ते पूजा
- Navnath Yewale
- 3 days ago
- 1 min read
नगदनारायण गडावर भाविकांची अलोट गर्दी; दर्शनासाठी मध्यरात्रीपासून भक्त गडावर

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त वैष्णवांच्या मेळ्याने पंढरपूर सजले आहे. लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी वीस लाखांवर वारकरी, भाविकांचा पंढरपुरात विठुरायाचा गजर सुरू आहे. शिवाय राज्यभरातील विठ्ठल-रूख्मिणी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. मराठवाड्याची धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील नगदनारायण गडावर दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली. गडाच्या परंपरेनुसार मठाधिपती महंत शिवाजी बाबा महाराज मार्गदर्शनाखाली मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या हस्ते मध्यरात्री विठ्ठल-रुख्मिणी मातेच्या मुर्तीची पुजा केली. आषाढी एकादशीच्या पर्वणीसाठी भाविकांनी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी गडावर गर्दी केली.
धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यातील नगदनारायण गडावर दर्शनाच्या पर्वणीसाठी भाविकांनी शनिवारी (5 जूलै) पासूनच गर्दी केली. मध्यरात्री मठाधिपती महंत शिवाजी बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. परंपरेनुसार मठधिपती महंत शिवाजी बाबा महाराज पंढरपूरहून शनिवारी रात्री नगदनारायण गडावर दाखल झाले. दर्शनासाठी गडावर येणार्या भाविकांना फराळाचे नियोजन, दर्शन व्यवस्थेची पाहणी केली. गडावर येणार्या भक्तांना सुविधांमध्ये काही कमतरता पडू नये अशा सूचनाही त्यांनी व्यवस्थापक, स्वयंसेवकांना दिल्या.

परंपरेनुसार मध्यरात्री 2:00 वाजता महंत शिवाजी बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते विठ्ठल- रुख्मिणी मातेच्या मुर्तींची पूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. परंपरेनुसार महंतांच्या पूजेपर्यंत भाविकांसाठी दर्शन सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. पूजा झाल्यानंतर मध्यरात्रीपासून भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.
मराठवाड्यात धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या गडावर भाविकांनी शनिवारपासूनच गर्दी केली होती. मध्यरात्रीपासून दर्शन खुले करण्यात आल्यानंतर मराठवाड्याच्या कानाकोपर्यातून भक्तांनी गडावर दर्शनाचा लाभ घेतला. विठुनामाच्याा गजरात भाविकांनी बारीला उभे राहून दर्शनाचा लाभ घेतला. दिवसभर भक्तांची गडावर ये- जा सुरू होती. भक्तांच्या गर्दीमुळे नगदनारायण गडाला मोठ्या यात्रेचे स्वरुप आले होते.
Comments