top of page

धुळवड साजरी करण्यासाठी जाणार्‍या तरुणांवर काळाची झडप! बीडमध्ये कार अपघातात एक ठार ; तीन जखमी दोघांची, प्रकृती गंभीर

बीड: होळी, धुलिवंदन साजरे करण्यासाठी रिसॉर्टवर जाणार्‍या तरुणांच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना बीडच्या नागरेवाडी शिवारात बीड -अहिल्यानगर मार्गावर सोमवारी (दि.2) घडली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.


बीड येथील रामतिर्थ परिसरातील कृष्णा जालिंदर मुळे वय 22 वर्षे हा तरुण आपल्या मित्रांसमवेत होळी, धुलिवंदन साजरा करण्यासाठी अपाल्या खासगी कारणे पश्चिम महाराष्ट्रातील रिसॉर्टवर जात होते. दरम्यान, बीड-आहिल्यानगर मार्गावरून व्हॅरणा आणि थार या दोन वाहणाने हा मित्रपरिवार शिरुर कासार मार्गे आहिल्यानगर कडे प्रवास करत होता. नागर्‍याचीवाडी शिवारात व्हॅरना कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारणे चार पलट्या घेतल्या.


अपघातग्रस्त कारचा एवढा वेग होता की, चार पलट्या खाऊन कार बाजूच्या विहीरीच्या कठड्याला धडकली आणि पुढील मोठा अनर्थ टळला. हा अपघात एवढा भीषण होता की कृष्णा जालिंदर मुळे (वय 22) वर्षे रा. बीड याचा जागीच मृत्यू झाला. प्रसाद खोले, यश पेंढरे व अन्य एक असे तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघात ग्रस्त कारच्या थार वाहनाने प्रवास करणार्‍या जखमी मित्रांना तातडीने बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारार्थ दोघांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, तर एकावर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments


bottom of page