धुळे—सोलापूर महामार्गावर गेवराईजवळ भीषण अपघात 6 जण ठार!
- Navnath Yewale
- May 27
- 1 min read

महामार्गाच्या दुभाजकात आडकलेली गाडी काढत असताना भरधाव कंटेनरने सात तरुणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत गेवराई शहरातील सहा जणांचा जगीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.
हा अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळी मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत दिसून येत होते.
हा अपघात गेवराई पासून जवळच गढीच्या उड्डाणपुलावर रात्री उशीरा झाला या अपघातामुळे गेवराईत सर्वत्र शोककळा पसरली आहे. दरम्यान रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास धुळे- सोलापूर महामार्ग क्रमांक 52 वर गढी येथील कारखान्यासमोर बाळासाहेब आतकरे यांची एक्स यू व्हि वाहन दुभाजकावर आदळून किरकोळ अपघात झाला होता. या अपघातात मात्र कुणीही जखमी झाले नव्हते.
दरम्यान, या अपघामध्ये दुभाजकामध्ये आडकलेली गाडी बाहेर काछण्यासाठी बाळासाहेब आतकरे आणि त्यांचे काही सहकारी सोमवारी रात्री उशीरा घटनास्थळी आले होते. यानंतर दुभाजकात अडकलेली गाडी काढत असतानाच अचानक भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने त्यांना जबर धडक दिली.
या भीषण धडकेत बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दिपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन नन्नवरे यांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच गेवराई पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या दुर्दैवी घटनेमुळे गेवराई तालुक्यात व्यक्त होत आहे.
घटनास्थळ, उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांची धाव :
गढीच्या उड्डाणपूलावर अपघात घडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अनेकांनी धाव घेतली होती.मात्र, सहा तरुण जागीच मृत्यूमुखी पडल्याने त्यांना मतदकार्य करता आले नाही. यानंतर सहा जणांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. याठिकाणी देखील शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सर्वांनी दुर्दैवी घटनेविषयी हळहळ व्यक्त केली.
Comments