top of page

नव्याने पसरत असलेला कोरोना विषाणू किती घातक ! डॉक्टरनी सांगितलं





कोव्हिड विषाणूमुळे हजारो लोकांचे जीव गेले. अशा काव्हिड विषाणूचे रुग्ण पुन्हा एकदा वाढले असून हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड या अशियातील देशांमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. भारतात देखील कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या बाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पण सध्या या देशांमध्ये जे काही रुग्ण वाढत आहे त्याबाबत पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. कपिल झिरपे यांनी याबाबत माहिती देत हा नवीन विषाणू धोकादाय नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. जेवढी चर्चा त्या देशांमध्ये कोव्हिड बाबत नाही तेवढी आपल्या देशात होत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.


सध्या हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड या देशांमध्ये कोव्हिडचे रुग्ण वाढत असून भारतात देखील चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे चेस्ट स्पेशालिस्ट डॉ. कपिल झिरपे म्हणाले की, या तीन देशांमध्ये कोव्हिडचे रुग्ण हे वाढत आहे. कोव्हिड विषाणू आहे तो अत्यंत विक आहे. असं आपल्याला सर्दी, खोकला होतं तसं हे विषाणू असून प्रत्येक वेळेस आपण भीती बाळगत नाही तर याबाबत काळजी घेत असतो. तशीच परिस्थिती या कोव्हिड विषाणूच्या बाबत आहे.


या देशांमध्ये जे काही रुग्ण वाढत आहे. त्याच कारण आहे की ते कोव्हिडची चाचणी करत आहे. म्हणून तिथे रुग्ण आपल्याला वाढलेले पाहायला मिळतील. तसेच प्रत्येक चाचणी केलेला रुग्ण हा गंभीर नसतो तसेच पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला रुग्णालयाची गरज भासते असं नाही. हा नवीन विषाणू ओमायक्रॉनच नवीन व्हायरस असण्याची शक्यता आहे. पण याला घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नसल्याचं यावेळी डॉ. झिरपे यांनी सांगितलं.


ते पुढे म्हणाले की, नव्या विषाणूच्या बाबतची चर्चा ही फक्त भारतात असून हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड या देशांमध्ये याबाबत कोणतीही चर्चा नाही. कोव्हिड हा एक व्हायरस असून असे अनेक व्हायरस असून आपल्याला याबाबत काळजी आयुष्यभर घ्याची आहे. जर कोणालाही सर्दी, खोकला झाल्यास त्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याची प्रत्यकेाने खबरदारी ही घेतली पाहिजे. तसेच अशा वेळी गर्दीत जाणे टाळणे आणि मास्कचा वापर करावा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणताही त्रास झाल्यास आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे हे खूपच गरजेचं आहे. सध्या हे काही कोव्हिड बाबत भीती व्यक्त केली जात आहे. अफवा पसरवली जात आहे त्यावर विश्वास ठेवू नका. असं आवाहन देखील यावेळी डॉ. कपिल झिरपे यांनी केलं आहे.

Comments


bottom of page