top of page

नसरापूर प्रकरणातील आरोपीस मध्यरात्री घटनास्थळावर नेले ,पोलिस तपासात आरोपीचा धक्कादायक खुलासा

पुणे: नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या निर्घुण अत्याचार प्रकरणात पोलिसांच्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आरोपी भीमराव कांबळे याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याने ज्या गाईच्या गोठ्यात अत्याचार केला, त्याच गोठ्यात तो चार ते सहा दिवस राहत होता. जवळच विटा उचलण्याचे काम मिळाल्याने त्याने आपले कपडे इतर असाहित्य त्या गोठ्यात ठेवले होते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमराव कांबळे तीन दिवस त्या ठिकाणी विटा उचलण्याचे काम करत होता. त्याच वेळी ती चिमुकली परिसरात खेळत होती. आरोपीची या चिमुकलीवर अगोदरपासूनच नजर होती. विटा उचलण्याचे काम संपल्यानंतर त्याच दिवशी त्याने चिमुकलीला गोठ्यात नेले. गोठ्यात घेऊन जाण्यापूर्वी त्याने तिला गाठी शेव खाण्यास दिली. त्यानंतर गोठ्यात नेऊन त्याने चिमुकलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.


पोलिसांच्या चौकशीत भीमराव कांबळे याने “ मी त्या दिवशी दारूच्या नशेत होतो ” असे सांगितले. मात्र हे विधान स्वत:चा बचाव करण्यासाठी केले जात असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.


चिमुकली बेपत्ता झाल्याचे समाजताच ग्रामस्थ नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. या शोधकार्यात भीमराव कांबळे स्वत:ही ग्रामस्थांसोबत सहभागी झाला होता. मात्र, जेव्हा नातेवाईक गोठ्याच्या दिशेने शोध घेण्यासाठी गेले तेव्हा तो तेथून पसार झाला. ही बाबही तपासात डघडकीस आली आहे.


आरोपीला मध्यरात्री घटनासथळी नेले: पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी भीमूराव कांबळेला मध्यरात्री घटनास्थळी नेले. चिमुकली नेमकी कोठे खेळत होती, अरोपीने जिला कुठून सोबत नेले आणि गोठ्यात कोणत्या ठिकाणी अत्याचार केला, याची पाहणी आरोपीच्या उपस्थितीत करण्यात आली. गावकर्‍यांच्या प्रचंड संतापामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता म्हणून वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या निर्णयानुसार ही पाहणी मध्यरात्री करण्यात आली.


पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन आरोपीकडून प्रत्येक बाबची सविस्तर माहिती घेतली. चिमुकलीच्या खेळण्याच्या जागेपासून गोठ्यापर्यंत संपूर्ण घटनाक्रम आरोपीकडून समजून घेण्यात आला. या प्रकारे रात्रीच्या वेळी पाहणी करण्यामागे सुरक्षा आणि तपासाच्या दृष्टीने योग्य तो व्यवस्थापन करण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता.


नसरापूर परिसरात ही घटना घडल्यानंतर संपूर्ण गावात संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन सखोल तपास सुरू केला आहे. लवकरात लवकर प्रकरणाचा निकाला लावण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. या प्रकरणात आरोपीने केलेल्या निर्घुण कृत्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या तपासातून समोर आलेली ही माहिती अत्यंत धक्कादायक आहे. सध्या आरोपीला पेालिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

Comments


bottom of page